Technology

चीप च्या कमतरतेने वाढवली सर्वांची चिंता- Global Chip Shortage

चीप च्या कमतरतेने वाढवली सर्वांची चिंता- Global Chip Shortage, important News semiconductor, chip global shortage

 

 कार-बाइक मोबाईल लॅपटॉप कम्प्युटर सहित सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करणाऱ्यांसाठी  करोना एक खूप मोठी समस्या उभी करत आहे.

 

 मागच्या हप्त्यात मारुती सुझुकी ने सांगितले की ते आपल्या गुजरात मधील कार उत्पादन प्लांट ला ऑगस्ट महिन्यामध्ये तीन हप्त्यासाठी बंद ठेवणार आहे. प्लांट बंद ठेवण्याचे कारण की करोना आल्यापासून सेमीकंडक्टर म्हणजे इलेक्ट्रॉनिक चिपची Chip सप्लाई सातत्याने घटत आहे.  आता परिस्थिती एवढी नाजूक झाली आहे, की जगातील बऱ्याच कार सहित अनेक प्रकारचे उपकरणे, प्रोडक्स यांचे उत्पादन युनिट बंद होण्याच्या मार्गावर आहेत. चीपच्या कमतरते मुळे भारतीय कंपन्यासुद्धा प्रभावित झाले आहेत .

 

 महिंद्रा, सुझुकी, किया यासारख्या अनेक ऑटोमोबाईल कंपन्या ग्राहकांना कार व वेळेवर देऊ शकत नाही. त्यांना डिलिव्हरी देण्यासाठी महिन्यापेक्षा जास्त वेळ लागत आहे.

 मोबाइल फोन लॅपटॉप कम्प्युटर चे नवीन मॉडेल लॉन्च केले जात नाही. जे केवळ सध्या आहेत त्यांची मोजक्या संख्येने सप्लाय होत आहे. शाओमी या कंपनीने तर आपले नवीन मॉडल ची सप्लाय सध्या थांबवली आहे.

 सोनी कंपनीचे म्हणणे आहे, की त्याचे प्रोडक्ट प्लेटेशन पाच ची सप्लाई पुढील वर्षी पर्यंत सामान्य होऊ शकणार नाही.

 

Chip चीप सप्लायची कमीचा भुर्दंड ग्राहकांना पडत आहे. कारण बऱ्याचश् सामान् 10 ते 21 टक्के पर्यंत महाग झाले आहेत, आणि तरीसुद्धा त्यांची वेळेवर डिलिव्हरी भेटेल याची शाश्वती नाही. त्यातच एखाद्या उपकरणाची चिप खराब झाली तर ती रिपेअर करणे सुद्धा मुश्किल झाले आहे.

 ज्या पद्धतीने कंपन्यांचे प्रॉडक्शन कमी करण्यासाठी मजबूर झाल्या आहेत, त्यातून स्पष्ट होते की चीपसची वैश्विक कमतरता Global Chip Shortage आणखीनच उग्र रूप धारण करणार आहे. काही कंपन्यांचे म्हणणे आहे की चीपस ची  कमतरता 2023 च्या अगोदर सुधारणे शक्य नाही.

 

Chip चीपसंचा वापर साधारणता इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल उपकरणांमध्ये केला जातो. कार मोबाईल लॅपटॉप कम्प्युटर वॉशिंग मशीन फ्रीज आणि घडी सारख्या अनेक वस्तू चीपच्या शिवाय बनवल्या जात नाहीत.

 

थोडक्यात सेमीकंडक्टर semiconductor म्हणजे चीप Chip इलेक्ट्रिकल उपकरणा मध्ये विद्युत सप्लाई ला कंट्रोल करण्याचे काम करते.

 करोना महामारी आल्यापासून चीपची कमतरतामुळे 170 प्रकारचे उद्योग प्रभावित झाले आहेत.सेमीकंडक्टरचे मुख्य निर्माता देश तेवान, कोरिया,चीन असे आहेत ज्या ठिकाणी करोनामुळे चीप बनवणारे कारखाने बंद आहेत आणि जे काही कारखाने सुरू आहेत त्या ठिकाणी अल्प प्रमाणात कर्मचारी काम करून अत्यंत कमी प्रमाणात प्रोडक्शन करत आहेत.

 

 महामारीमुळे मालाची दळणवळण सुद्धा प्रभावित झालेली आहे. हे देखील चिप्स सप्लाय ची कमतरता असण्याचे एक कारण असू शकते.

 

 करोना मुळे वर्कफॉर्म होम आणि ऑनलाईन शिक्षण संपूर्ण जगामध्ये चालत आहे, यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांची मागणी ही मागील वर्षा पासून अतिशय वेगाने वाढली आहे. कमी प्रोडक्शन आणि जास्त मागनी  मुळे हे संपूर्ण बॅलन्स बिघडले आहे.

 

 भारत सरकार सुद्धा चिप Chip उत्पादक देशांमध्ये मधील आपल्या राजनेतिक का कडून प्रयत्न करत आहे की चिप्स Chip ची  सप्लाई सामान्य व्हावी.आता यात किती प्रमाणात यश मिळेल हे येत्या काळातच आपल्याला पाहायला मिळेल. 

Recent Posts

SBI Mudra Loan तात्काळ मिळवा 1 लाखा पर्यंत बिनव्याजी लोन

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला लोन हवे आहे का ? किंवा तुमच्या अगोदरच सुरू असलेल्या…

SBI Mudra Loan । तात्काळ मिळवा बिनव्याजी कर्ज

SBI Mudra Loan अटी काय आहेत ? 1) SBI बँकेत खाते असणे आवश्यक आहे. 2)…

SBI Mudra Loan फक्त 5 मिनिटात मिळवा 50 हजार रुपये लोन घरबसल्या पहा सविस्तर माहिती

SBI E-Mudra Loan - स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना फक्त ५ मिनिटात ५० हजार…

Maha IT Genius E-Test 2022 Free महा आयटी जिनिअस

शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी - Free Maha IT Genius E-Test 2022 मोफत राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये…

Ready for the LIC IPO? एलआयसी(LIC) आयपीओसाठी(IPO) तयार आहात?

Ready for the LIC IPO? एलआयसी(LIC) आयपीओसाठी(IPO) तयार आहात? एलआयसी आयपीओ लवकरच लॉन्च करीत आहे.…

आज मकर संक्रांत आहे. “तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला”

आज मकर संक्रांत आहे. “तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला” पूर्वं परित्यज्य यदा ग्रहाणां राशिं परं…