सुखी आणि समृद्ध राहण्याचा राजमार्ग.

सुखी आणि समृद्ध राहण्याचा राजमार्ग.वा वा वा वा फोर वा चार वा

 

पहिलावा म्हणजे काय तर वाचवा आता काय वाचवा आपल्यात असलेली सकारात्मक ऊर्जा, पैसे.
 तुम्हाला मिळणाऱ्या पैशातले थोडे थोडे पैसे बाजूला ठेवा सगळेच्या सगळे पैसे तुमच्या व्यवसायामध्ये परत गुंतवण्याचे आवश्यकता नाही.दर महिन्याला तुमचा पगार निश्चित करा आणि तो पगार घ्या.आणि ऊर्जाआपण बऱ्याचदा वायफळ बडबड करत असतो. अनावश्यक जास्ती चा विचार ओव्हर्थिंकिंग करत असतो यात आपली खूप ऊर्जा वाया जाते.मग हे थांबून आपण आपली ऊर्जा वाचवू शकतो.
दुसरा वा आहे तो वाढवा वाचवलेले पैसे घरात ठेवू नका बँकांमध्ये फिक्स डिपॉझिट करा किवा जास्त अशा गुंतवणूकीत ठेवा की जेणेकरून तुम्हाला जास्त परतावा मिळेल.जसे की जास्त परतावा देणाऱ्या कंपन्यांच्या ठेवी,शेअर मार्केट असेल म्युचल फंड असेल यामध्ये गुंतवा तसेच आपला इन्शुरन्स सुद्धा असला पाहिजे. लाइफ इन्शुरन्स असेल हेल्थ इन्शुरन्स असेल यामध्ये पैसे गुंतवा. जसं पैसा वाढवणे आवश्यक आहे तसंच ज्ञान अपडेट ठेवणे ज्ञान वाढवणं हेसुद्धा आवश्यक आहे यासाठी वाचनाचा छंद ठेवा हे पण तेवढेच आवश्यक.
तिसरा वा वापरा हे पैसे वाढतील तसे वाढलेले पैसे तुम्ही घरी ठेवू नका ते आपल्या मुलांना उपयोगी पडतील त्यांच्यासाठी काहीतरी ठेवला पाहिजे हा विचार ठीक आहे पण तुम्ही पण एन्जॉय करा.आयुष्य जगापाहिजे तुम्हाला परदेशात अन्य कुठे फिरायला जायचं असेल.किवा तुमचे काही स्वप्न असतील ते देखील पूर्ण करा
 त्यासाठी वाढवलेल्या पैशांमधून मधून काही पैसे काढा.दहा बारा लाख रुपये झाली असतील एक चार-पाच लाख रुपये काढा. आणि वापरा. हे पैसे तुम्ही वापरले तर हे चलन मार्केट मध्ये फिरेल म्हणजे इकॉनॉमी ला बूस्ट मिळेल. आणि बुस्ट मिळाला की शेअर्स सुद्धा वाढतील आणि तुम्ही शेअर्स मध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाढेल.
चोथा वा वाटा तो खूप महत्त्वाचा व आहे तुम्हाला वरती गेल्यानंतर उपयोगी पडेल तो म्हणजे वाढलेले काही पैसे वाटा जे गरीब लोक आहेत त्यांना ते पैसे वाटा त्या पैशांमधून सेवाकार्य करा मदत करा.आपल्या संस्कृती मध्ये एक संस्कार असतो तो म्हणजे दानधर्म जेणेकरून तुम्ही वर गेल्यानंतरयाचा उपयोग होईलच आणि लोकांनाही मदत होईल. पैशा सोबतच आपण जे काय शिकलो जे ज्ञान मिळवलं जे काय संस्कार मिळवले तेसुद्धा लोकांना सहजतेने वाटायला शिका.

अशा योग्य प्रकारे या चार वा मधून आपल्या जीवनाचे नियोजन केले तर नक्कीच आपले जीवन सुखी समृद्ध होईल