How to Complaint directly to PM in Marathi -पंतप्रधानांना ऑनलाइन तक्रार कशी करावी

पंतप्रधानांना ऑनलाइन तक्रार कशी करावी , (पीएमओ ऑफिस तक्रार क्रमांक, पोर्टल, प्राइम टोल फ्री हेल्पलाइन, मोबाइल फोन नंबर, फेसबुक, ट्विटर खाते, YouTube चॅनेल) (PM shi Complaint kashi karavi, Complaint Status, PMO Portal , Helpline number, Email ID, Postal Address) 

केंद्र सरकारद्वारे विभिन्न प्रकारच्या योजना चालवल्या जातात. अनेकदा योजना सुरु झाल्यानंतरही प्रत्यक्ष जमीनीवर त्या व्यवस्थित काम करत नाही. त्यांचा लाभ गरजूंपर्यंत पोहचत नाही. अशा स्थितीत नागरिकाची इच्छा असेल तर तो याची तक्रार तो सरळ देशाच्या पंतप्रधानांकडे करु शकतो.योजनाच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही  समस्येच्या निवारणासाठी पंतप्रधानांकदे तक्रार केली जाऊ शकते.यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्लेटफार्म उपलब्ध आहेत. या लेखात आम्ही आपल्याला ते सगळे प्रकार सांगू की ज्याद्वारे घरबसल्या पंतप्रधानांना ऑनलाइन तक्रार करु शकता.

ऑनलाइन पध्दतीने पंतप्रधानांना तक्रार कशी करावी?

  • जर आपण पंतप्रधानांकडे ऑनलाइन तक्रार करु इच्छिता ,तर त्यासाठी आपण gov.in या संकेतस्थळाला भेट  देऊ शकता.जर आपल्याला संकेतस्थळाचा पत्ता व्यवस्थित माहिती नसेल तर  आपण पीएम इंडिया शोधले ,तरीही आपल्याला संकेतस्थळाचा शोध लागेल. लक्षात ठेवा,ज्या संकेतस्थळात  .gov हा शब्द असतो,ते अधिकृत संकेतस्थळ असते.
  •  पंतप्रधानांच्या या अधिकृत संकेतस्थळावर देशात बोलल्या जाणार्या विभिन्न भाषा उपलब्ध आहेत. आपल्याला जी सहज वाटते त्या भाषेची निवड उजव्या बाजुच्या साईडच्या काॅर्नरवरुन करु शकता. जर आपण मराठी भाषी असाल तर मराठी ची निवड करा, तेव्हा आपल्याला पूर्ण संकेतस्थळ मराठीत दिसू लागेल,ज्यामुळे आपल्याला तक्रार करणे सोपे होईल.
  • साइटच्या मुखपृष्ठावर खालच्या बाजूस आपल्याला  “प्रधानमंत्री के साथ बात करें” असा  एक पर्याय मिळेल. या पर्यायत आपल्याला अन्य दोन पर्याय दिले जातील. ज्यात पहिला पर्याय  “अपने विचार, सुझाव, राय यहां साझा करें” हा मिळेल,ज्यात आपण आपल्याकडून  पंतप्रधानांना आपला विविध सल्ले /विचार  देऊ शकतो. दूसर्या पर्यायात आपल्याला “प्रधानमंत्री को लिखे” हे वाक्य दिसेल. जिथे आपण आपली तक्रार दाखल करण्यासाठी क्लीक करु शकतो.
  • क्लीक केल्यानंतर एक फाॅर्म दिसेल.ज्यात आपण आपले नाव,तक्रारीसंदर्भात माहीती आणि पत्ता,राज्य,जिल्हा,देश आणि आपला संपर्क क्रमांक,आयडी टाकावा लागेल. सोबतच तक्रारीसाठी आपल्याला विचारलेली माहीती विस्तारपूर्वक भरावी लागेल.
  •  माहीती भरल्यानंतर  सगळ्यात खाली एक बाॅक्स दिसेल,जिथे आपण आपली तक्रार सविस्तर लिहू शकतो.
  •  बाॅक्स में तक्रार लिहीण्यासोबतच साईटवर आपल्याला पीडीएफ किंवा अन्य फाईल अटैच करण्यासाठीचा पर्याय मिळेल. तिथे अटैच करुन आपण तक्रार पूर्ण करु शकतो. 
  • शेवटी सत्यापित करण्यासाठी  एक कैप्चा कोड भरावा लागेल. आणि सबमिट बटनावर क्लीक करताच आपली तक्रार दाखल करुन घेतली जाईल. सोबतच मोबाईलवर मॅसेजद्वारे  एक रजिस्ट्रेशन नंबर पाठवला जाईल.

 

तक्रारीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी काय करावे?

  • जर आपण पंतप्रधानांना तक्रार केली आहे,आणि आपण आपल्या तक्रारीची सद्यस्थिती जाणून घेऊ इच्छिता की तक्रार दाखल झाली की नाही यासाठी   link वर क्लीक करावे.
  • त्याच्या मुखपृष्ठावर आपल्याला व्यू ग्रीवेंस स्टेटस आॅप्शन दिसेल. त्यावर क्लीक करुन आपण आपल्या तक्रारीची सद्यस्थिती पाहू शकतो.
  • क्लिक केल्यानंतर एक फाॅर्म ओपन होईल.तिथे आपल्याला मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर टाकणे अनिवार्य असेल. जर आपण संपर्क क्रमांक टाकला असेल तर तोच संपर्क क्रमांक टाकावा. सोबतच कैप्चा कोड टाकून सबमिट करावे. यानंतर आपल्याला आपल्या तक्रारीची सद्यस्थिती दिसू शकेल. 

सोशल मीडियाच्या माध्यमातुन के तक्रार करा.

आजकाल सोशल मीडियाचा बोलबाला आहे.  काही लोक सोशल मिडिया अकाऊंटसद्वारे पंतप्रधानांना संपर्क करत तक्रार दाखल करु शकतात.यासाठी आपल्याला  पीएमओ कार्यालयाचा आॅफिशियल अकाऊंट माहिती असायला हवा. ट्विटरवर याचा अधिक उपयोग केला जातो. आणि सरकारसमोर आपले मत व्यक्त केले जाते. असे निदर्शनास आले आहे की, ट्वीटवर प्रतिसादही लवकर मिळतो. त्यामुळे आपण आपली तक्रार सोशल मिडिया अकाऊंटवरही करु शकतो. 

खाली पंतप्रधान कार्यावयाचे काही  सोशल अकाउंट च्या लिंक शेअर केल्या जात आहेत, ज्याचा उपयोग करुन आपण आपली तक्रार दाखल करु शकतो. 

पीएमओचा ईमेल आईडी [email protected]
कंप्लेंट सेल ईमेल एड्रेस [email protected]

 

 

फेसबुक अकाउंट facebook.com/PMOIndia
ट्विटर अकाउंट twitter.com/PMOIndia
यूट्यूब अकाउंट youtube.com/user/PMOfficeIndia

अन्य वाचा :  केंद्राद्वारे खूप योजना चालवल्या जातात,त्याचा लाभही आपल्याला मिळू शकतो  त्यासाठी येथे क्लीक करावे.

तक्रारीसाठी पंतप्रधानांना पत्र लिहा.

आपल्याला वाटल्यास ज्याला पंतप्रधान कार्यालय म्हटले जाते, त्याच्या पत्त्यावर आपण पत्रही लिहु शकता.आपण पंतप्रधानांच्या निवासस्थानीही पत्र लिहू शकता.त्यासाठी पंतप्रधान कार्यालय आणि निवासाचाही पत्ता दिला आहे.

प्राइम मिनिस्टर ऑफिस साउथ ब्लॉक,रायसीना हिल,नई दिल्ली-110011
दिल्ली निवास  7,रेस कोर्स रोड नई दिल्ली

थेट पंतप्रधानांना तक्रार कशी करावी? 

सद्यस्थितित जगातील सर्व देशांचे पंतप्रधान स्वत: आपले अकाऊंट चालवतात. त्यासाठी त्यांची एक खाजगी टीम काम करत असते.सध्या आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यामुळे खाली नरेंद्र मोदी जी यांची  व्यक्तीगत सैशल मिडिया अकाऊंटची माहिती  प्रदर्शित केली जात आहे.त्यावरही आपण थेट त्यांना तक्रार करु शकतो.

ईमेल एड्रेस [email protected]
फेसबुक अकाउंट facebook.com/narendramodi.official
ट्विटर अकाउंट twitter.com/narendramodi

 

 

गूगल प्लस अकांउट plus.google.com/narendramodi

हेही खूप आवश्यक आहे की आपण आपल्या सर्व कर्तव्यांचे पालन करावे आणि सोबतच देशाला जागृत असणेही खूप गरजेचे आहे.त्यासाठी आपल्याला वाटले की पंतप्रधानांना तक्रार केली पाहिजे,तर ती अवश्य करावी.

 

 

Leave a Comment