प्रविण आत्माराम शेजुळ pravin shejul Majalgaon

प्रविण आत्माराम शेजुळ (pravin shejul ,shivshambhu vichar manch ) Majalgaon

कार्याचा अनुभव: २०+ वर्षांचा इतिहास विषयातील अनुभव

 

विशेष कार्य / अनुभव

शिवशंभु विचार मंच – संस्थेच्या माध्यमातून शिवचरित्र, मराठ्यांचा इतिहास व राष्ट्रभक्तीपर विचारांचे जनजागरण.

‘शिवशंभु विचार दर्शन’ कार्यशाळेचे पुणे येथे प्रतिवर्षी आयोजनात सहभाग व मार्गदर्शन भूमिका. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या वतीने इतिहास कार्यशाळेचे परिषदेचे आयोजन. रायगडावरील शिवराज्याभिषेक कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सहभाग. पुणे, छत्रपती संभाजीनगर येथे शिवचरित्र कार्यशाळा आयोजनात सहभाग. परभणी, माजलगाव अंबाजोगाई आणि बीड येथे शिवचरित्र अभ्यास मंडळ या उपक्रमाचे आयोजन.

शिवचरित्र प्रसारासाठी महाराष्ट्रभर प्रवास – व्याख्याने, चर्चासत्रे, कार्यशाळा, शिबिरे, तसेच समाजप्रबोधनात्मक उपक्रम.

लेखन कार्य – शिवचरित्र, मराठा इतिहास, पानिपत युद्ध व विविध ऐतिहासिक घटनांवर अभ्यासपूर्ण लेखन.

तरुण इतिहास अभ्यासकांचे संघटन – मार्गदर्शन व प्रेरणा देणारे नेतृत्व.

इतिहास विषयावर लेखन करणाऱ्या नवोदित तरुण लेखकांना पुस्तक प्रकाशनासाठी मार्गदर्शन.

इतिहास साहित्य प्रदर्शनाचे आयोजन – शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून.

ऐतिहासिक स्थळांच्या अभ्यास सहलींचे आयोजन – युवांसाठी ज्ञानवर्धक व अनुभवसमृद्ध सहली.

सामाजिक योगदान – कोरोना काळामध्ये रुग्णांना आर्थिक वैद्यकीय सहकार्य मिळण्यासाठी मदत

कॅन्सर ग्रस्त रुग्णांना मार्गदर्शन या कार्यासाठी सन्मानित. सरकारच्या डिजिटल इंडिया या उपक्रमाची जनजागृती.

आजीवन सदस्य- श्रीशिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे