आज मकर संक्रांत आहे. “तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला”

आज मकर संक्रांत आहे. “तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला”

पूर्वं परित्यज्य यदा ग्रहाणां राशिं परं प्रत्ययनं स कालः। संक्रांतिवाच्योsयमतिप्रशस्तः स्नाने च दाने च स्वेर्विशेषात्।। संक्रांत म्हणजे काय… याचा अर्थ समजून घेऊन आपण सण म्हणून साजरा करणे उचित ठरेल. कोणताही ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत ज्यावेळी प्रवेश करील, त्या प्रवेशकाळाला ‘संक्रांति’ असे म्हणतात. हा संक्रांतिकाल अत्यंत सूक्ष्म असतो. म्हणून त्यावेळी धार्मिक विधीसाठी पुण्यकाल असे सांगितलेले आहे. ते संक्रांतीच्या पुण्यकालात स्नान, दान इत्यादी करणे पुण्यकारक आहे, असे शास्त्रकार सांगतात. मकर संक्रांत म्हणजे काय… धनु राशीतून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, या प्रक्रियेला मकर संक्रांती असं म्हटलेलं आहे. मकर संक्रांत भारताच्या विविध राज्यात विविध नावाने आणि विविध पद्धतीने साजरी केली जाते जसे मकरसंक्रात – Makar Sankranti (महाराष्ट्र). . . पोंगल – Pongal (तामिलनाडु) . . . उत्तरायण (गुजरात व राजस्थान) . . . लोहढी – Lohri (पंजाब) . . . माघमेला – Magh Mela (ओडिसा) . . . भोगाली बिहु – Bihu (आसाम) . . . संक्रांती – Sankranti (कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, बिहार) अशी विविध नावं या सणाला आहेत.

Leave a Comment