एपीजे अब्दुल कलाम यांचा जीवन परिचय | Apj Abdul Kalam biography in marathi

एपीजे अब्दुल कलाम यांचा जीवन परिचय | Apj Abdul Kalam biography 

अब्दुल कलाम Apj Abdul Kalam हे भारताचे आकरावे राष्ट्रपती आणि प्रथम अ- राजकीय राष्ट्रपति होते, त्यांना हे पद विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विशेष योगदानामुळे मिळाले होते. ते एक इंजिनियर आणि वैज्ञानिक होते, कलामजी 2002-07 पर्यंत राष्ट्रपतीपदावर होते. राष्ट्रपति बनल्यानंतर कलाम देशवासियांच्या नजरेत अतिशय सन्मानित निपुण व्यक्ति होते, अब्दुल कलाम Apj Abdul Kalam यांनी जवळजवळ चार दशक वैज्ञानिकाच्या रूपात कार्य केले आहे. ते अनेक प्रतिष्ठित संघटनांचे व्यवस्थापकही होते.

एपीजे अब्दुल कलाम जीवन परिचय (APJ Abdul kalam biography nd history)

 

क्रमांक जीवन परिचय बिंदु अब्दुल कलम जीवन परिचय
1.    पूर्ण नाव डॉक्टर अवुल पाकिर जैनुल्लाब्दीन अब्दुल कलाम
2.    जन्म 15 अक्टूबर, 1931
3.    जन्म स्थान धनुषकोडी गांव, रामेश्वरम, तमिलनाडु
4.    माता-पिता असिंमा , जैनुलाब्दीन
5.    म्रत्यु 27 जुलाई 2015
6.    राष्ट्रपतिपद 2002-07
7.    छंद पुस्तक वाचणे,लेखन, वीणा वादन

अब्दुल कलाम जन्म आणि शैक्षणिक जीवन (Apj Abdul Kalam Education)

अब्दुल कलाम Apj Abdul Kalamजी यांचा जन्म 15 आॅक्टोंबर  1931 रोजी तामिळनाडू राज्यातील धनुषकोडी गाव, रामेश्वरम येथे नावाडी परिवारात झाला.ते  तमिल मुसलमान होते.त्यांचे पूर्ण नाव  डॉक्टर अवुल पाकिर जैनुल्लाब्दीन अब्दुल कलाम Apj Abdul Kalam असे होते. त्यांच्या वडीलांचे नाव जैनुलाब्दीन होते. त्यांचा मध्यमवर्गीय परिवार होता. त्यांचे वडील मासेमारी करणरांना आपली नाव देऊन घराची उपजिविका चालवत असत.  बाल कलाम यांना आपल्या शिक्षणासाठी खूप संघर्ष करावा लागला. ते घरोघरी वर्तमानपत्र वाटत असत,आणि त्या पैशातून आपल्या शाळेची फिस भरत असत.  अब्दुल कलाम यांच्यावर  वडीलांचे   अनुशासन, प्रामाणिकपणा  आणि उदार स्वभाव हे झाले होते. त्यांच्या आई  ईश्वरावर असिम श्रध्दा होती.  कलाम यांचे  3 मोठे भाऊ आणि   1 मोठी बहीण होती. त्यांच्याशी कलाम यांची खूप जवळीक होती.

अब्दुल कलाम Apj Abdul Kalam यांचे प्रारंभिक शिक्षण रामेश्वरम एलेमेंट्री स्कूल येथे झाले. 1950 मध्ये कलाम यांनी  बी एस सी ची परीक्षा st. Joseph’s college येथुन पूर्ण केली. त्यानंतर 1954-57 मध्ये मद्रास इंस्टीट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी (MIT) मध्ये एरोनाॅटिकल इंजीनियरिंग मध्ये डिप्लोमा पूर्ण केला.बालपणापासून फायटर पायलट बनण्याचे त्यांचे स्वप्न होते. परंतु वेळेनुसार त्यांचे स्वप्न बदलले. 

अब्दुल कलाम यांच्या करियरची सुरुवात  (APJ Abdul Kalam career) 

1958 मध्ये  अब्दुल कलाम Apj Abdul Kalam D.T.D. and P. मेमध्ये तंत्रज्ञान केंद्रात वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून कार्यरत झाले. येथे  राहून त्यांनी prototype hover craft साठी निर्मित  वैज्ञानिक टीमचे नेतृत्व केले. करियरच्या प्रारंभीच अब्दुल कलाम Apj Abdul Kalam यांनी  इंडियन आर्मीसाठी स्माॅल  हेलीकाप्टर डिजाईन केले होते. 1962 मध्ये अब्दुल कलाम संरक्षण संशोधन सोडुन भारताच्या  अवकाश संशोधनात कार्य करु लागले. 1962 पासून 82 पर्यंत अवकाश संशोधनासंदर्भातील अनेक पदांवर ते कार्यरत होते.  1969 मध्ये  कलाम ISRO मध्ये भारताच्या पहिल्या  SLV-3 (Rohini)  वेळी  प्रोजेक्ट हेड बनले.

अब्दुल कलाम Apj Abdul Kalam यांच्या  नेतृत्वात 1980 मध्ये  रोहिणीला यशस्वीपणे  पृथ्वीच्या निकट स्थापित करण्यात आले. त्यांच्या  या  महत्वपूर्ण योगदानासाठी  1981 मध्ये भारत सरकारद्वारे त्यांना  भारताच्या  राष्ट्रीय पुरस्कारांपैकी  एक पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आले. अब्दुल कलाम नेहमीच आपल्या  सफलतेचे  श्रेय आपल्या आईवडीलांना देत असत. त्यांचे म्हणणे होते की, त्यांच्या आईनेच त्यांना चांगले -वाईट समजण्याची शिकवण दिली होती. ते सांगत की” माझी अभ्यासातील रुची पाहून माझ्या  आईने छोटासा लॅम्प विकत आणला होता, त्यामुळे मी रात्री 11 वाजेपर्यंत अभ्यास करत असे. आईने सहकार्य केले नसते तर मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो.” 

अब्दुल कलाम यांना राष्ट्रपतिपद   (APJ Abdul Kalam President Life)

1982 मध्ये अब्दुल कलाम Apj Abdul Kalam यांना पुन्हा संरक्षण संशोधन आणि विकास संघटनचे  director बनवले गेले. त्यांच्या नेतृत्वात  Integrated guided missile development program ची यशस्वीपणे सुरुवात करण्यात आली. अग्नि, पृथ्वी आणि अवकाश प्रक्षेपणात  कलाम यांची खूपच महत्वपूर्ण भूमिका राहीली.  सन 1992 मध्ये  APJ अब्दुल कलाम संरक्षणमंत्र्याचे विज्ञान सल्लागार आणि  सुरक्षा शोध आणि विकास विभागाचे  सचिव बनले. ते या पदावर 1999 पर्यंत कार्यरत होते. भारत सरकारच्या  मुख्य वैज्ञानिकांच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट आहे. 1997 मध्ये  विज्ञान आणि  भारतीय संरक्षण क्षेत्रातील योगदानासाठी डाॅ.कलाम यांना भारताचा सर्वोच्च पुरस्कार  “भारत रत्न” देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

 2002 मध्ये  भारतीय जनता पार्टी पुरस्कृत  एनडिए  घटक दलाने डाॅ.अब्दुल कलाम Apj Abdul Kalam यांना राष्ट्रपति निवडणुकीत आपला उमेदवार घोषित केले. त्याचे सर्वांनी समर्थन केले. आणि 18 जुलाई 2002 रोजी डाॅ. एपीजे अब्दुल कलाम यांनी  राष्ट्रपतिपदाची शपथ घेतली. कलाम कधीही राजकारणाशी संबधित नव्हते,तरीही भारताच्या सर्वोच्च पदावर ते विराजमान झाले. जीवनात  सुख सुविधांचा अभाव असतांनाही ते राष्ट्रपतिपदापर्यंत पोहोचले, ही गोष्ट आपल्यासाठी प्रेरणादायी आहे.

आजचे अनेक तरुण डाॅ. एपीजे अब्दुल कलाम यांना आपले आदर्श मानतात. छोट्याशा गावात जन्म घेऊन एवढ्या उंचीपर्यंत पोहोचणे ही सोपी गोष्ट नाही. ते सातत्य , कठोर परिश्रम आणि कार्यप्रणालीच्या बळावर  अपयशाला झेलत अग्रेसर होत राहिले, यापासून आम्हीही बोध घेतला पाहिजे. 

एपीजे अब्दुल कलाम यांचा स्वभाव –

अब्दुल कलाम Apj Abdul Kalam यांना मुलांबद्दल खूप आपुलकी होती. ते नेहमीच आपल्या देशातील तरुणांना चांगले धडे देत आले आहेत, ते म्हणतात की जर तरुणांना हवे असेल तर संपूर्ण देश बदलू शकतो. देशातील सर्व लोक त्याला ‘मिसाईल मॅन’ नावाने संबोधतात. डॉ.एपीजे कलाम यांना भारतीय क्षेपणास्त्रांचे जनक म्हणून ओळखले जातात. कलाम जी भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत, ते  अविवाहित होते तसेच  वैज्ञानिक पार्श्वभूमीतून राजकारणात आलेले होते. एपीजे अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती बनताच देशात नवे पर्व सुरू केले, जे आजपर्यंत एक आयाम आहे.

राष्ट्रपतिपद नंतरचा प्रवास  –

अध्यक्षपद सोडल्यानंतर डाॅ.कलाम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी तिरुवनंतपुरमचे कुलपती झाले. यासह अण्णा विद्यापीठाच्या एरोस्पेस अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक  म्हणून नियुक्त झाले याशिवाय, देशातील अनेक महाविद्यालयांमध्ये त्यांना अभ्यागत प्राध्यापक म्हणून बोलावण्यात आले.

एपीजे अब्दुल कलाम यांची पुस्तके  (APJ Abdul Kalam books )

 अब्दुल कलम साहेब यांची काही पुस्तके,जी त्यांनी स्वत: लिहिली होती.

  • इंडिया 2020 – ए विशन फॉर दी न्यू मिलेनियम

 

  • विंग्स ऑफ़ फायर – ऑटोबायोग्राफी

 

  • इग्नाइटेड माइंड

 

  • ए मेनिफेस्टो फॉर चेंज

 

  • मिशन इंडिया

 

  • इन्सपारिंग थोट

 

  • माय जर्नी

 

  • एडवांटेज इंडिया

 

  • यू आर बोर्न टू ब्लॉसम

 

  • दी लुमीनस स्पार्क

 

  • रेइगनिटेड

अब्दुल कलाम Apj Abdul Kalam यांना मिळालेले अवार्ड आणि सन्मान –

 

अवार्ड मिळाल्याचे वर्ष अवार्डचे नाव
1981 भारत सरकार द्वारा पद्म भूषण 
1990 भारत सरकार द्वारा पद्म विभूषण
1997 भारत सरकार द्वारा देश चा सर्वोच्च सम्मान भारत रत्न 
1997 इंदिरा गाँधी अवार्ड
2011 IEEE होनोअरी मेम्बरशिप

याव्यतिरिक्त अनेक देश विदेशातील विद्यापीठांनी त्यांना डाॅक्टरेट प्रदान केली.

एपीजे अब्दुल कलाम यांचा मृत्यू (dr apj abdul kalam death) –

डाॅ. कलाम 27 जुलै 2015 रोजी शिलाँग येथे गेले होते. वहां IIM शिलाँग येथील  समारोहादरम्यान त्यांची तब्येत अचानक बिघडली. तेथे एका महाविद्यालयात विद्यार्थ्यासमोर भाषण करतांना ते अचानक खाली कोसळले,त्यानंतर त्यांना शिलाँग हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. नाजुक परिस्थितीमुळे त्यांना आयसीयूत अॅडमिट केले.तिथेच त्यांनी अंतिम श्वास घेत जगाचा निरोप घेतला. या दु:खद बातमीनंतर सात दिवसांचा राजकीय शोक घोषित करण्यात आला. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.मृत्युनंतर के बाद 28 जुलै रोजी त्यांचे पार्थिव  गुवाहाटीहून  दिल्लीला आणण्यात आले. दिल्लीच्या निवासस्थानी जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले. यथे मोठमोठ्या नेत्यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांचे पार्थिव एयरबसद्वारे  त्यांच्या गावी नेण्यात आले. जुलै 2015 रोजी रामेश्वरजवळ त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला. 

अब्दुल कलाम साहब, ज्यांना मिसाईल मॅन म्हटले जाते, त्यांनी आयुष्यभर  देशाची सेवा केली, त्यांच्या ज्ञानाच्या माध्यमातून   देशाला अनेक क्षेपणास्त्रे दिली आणि देशाला शक्तिशाली बनवले.भारताला सुरक्षित बनवण्याच्या दृष्टीने त्यांनी पृथ्वी, अग्नी सारखी क्षेपणास्त्रे दिली. ज्ञान विज्ञान क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या कलाम साहेबांना देशाला शक्तिशाली आणि स्वावलंबी बनवायचे होते. त्यांनी तत्त्वज्ञानात देशाला स्वावलंबी बनवले. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात देशासाठी खूप योगदान दिले.  ते आपल्या सरळ आणि साधारण व्यवहारासाठी प्रसिध्द होते. मुस्लिम असल्याकारणाने त्यांना अन्य देशांनी आपल्या देशात निमंत्रित केले. परंतु देशाप्रती प्रेम असल्यामुळे त्यांनी कधीही देशाचा त्याग केला नाही.त्यांना देशाचे यशस्वी राष्ट्रपती म्हणून ओळखले जाते. त्यांनी वेळोवेळी देशाच्या युवकांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या उदबोधन आणि पुस्तकांद्वारे युवकांना मार्गदर्शन केले.

 

Leave a Comment