Atal Pension Yojana – अटल पेंशन योजना (APY) असंघटीत क्षेत्रात काम करणार्या लोकांसाठी खूपच लाभदायक सामाजिक सुरक्षा योजना आहे.APY मध्ये गुंतवणुक केल्यामुळे निवृत्तीनंतर खर्चासाठी आपल्याला नियमित उत्त्पन्न मिळते. केंद्र सरकारने Atal Pension Yojana APY योजना मे 2015 ला सुरु केली.
Atal Pension Yojana अटल पेंशन योजनेची सुरुवात आपल्या देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्याद्वारे 1जुन 2015 रोजी करण्यात आली . या योजनेअंतर्गत लाभार्थीचे वय 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1000 ते 5000 रुपयापर्यंतची धनराशी प्रतिमाह दिली जाईल. Atal Pension Yojana च्या अंतर्गत पेंशनची रक्कम ही लाभार्थ्याने केलेली गुंतवणुक आणि वयाच्या अनुषंगाने निश्चित केली जाईल. या योजनेच्या अधिक माहितीसाठी उदा. अमाउंट चार्ज,रजिस्ट्रेशन प्रक्रिया,पात्रता,आवश्यक कागदपत्रे आदीसाठी आमचा हा लेख शेवटपर्यंत लक्षपूर्वक वाचावा.
APY 2020: या योजनेअंतर्गत अर्ज करणार्या अर्जदाराला दरमहा प्रिमियम जमा करावा लागेल.त्यानंतर अर्जदाराच्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सरकारद्वारे वृध्दावस्थेत अर्थिक सहायता ( Financial assistance will be provided in the form of monthly pension in old age) प्रदान केली जाईल. अटल पेंशन योजना 2020 मध्ये केवळ कमी रक्कम जमा करुनही आपण पेंशनचे हक्कदार होऊ शकता शिवाय अकाली मृत्यु झाल्यास आपल्या परिवारालाही याचा लाभ होऊ शकतो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे वय 18 ते 40 वर्ष वयाची अट आहे. तरच या योजनेचा लाभ घेता येईल. जर एखादा लाभार्थी वयाच्या आठराव्या वर्षी या योजनेशी जोडला गेला तर तर त्याला 210 रुपये प्रिमियम दरमहा भरावा लागेल. ज्यांचे वय 40 आहे,त्यांना 297 ते 14,54 रुपयापर्यंत प्रिमियम भरावा लागेल.अटल पेंशन योजना 2020 मध्ये सहभागी होण्यासाठी लाभार्थीचे बँक खाते असणे अनिवार्य आहे. आणि बँक खाते हे आधार लिंक असावे. जे लोक आयकरदाते आणि सरकारी नोकर आहेत.त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. इच्छुक लाभार्थ्यांला भारताच्या कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत अटल पेंशन योजनेसाठी खाते उघडता येईल.
Table of Contents
अटल पेंशन योजना चा उद्देश्य:
असंघटीत क्षेत्राच्या कामगार लोकांना पेंशन देऊन त्यांचे भविष्य सुरक्षित करणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे या या योजनेचा मुख्य हेतू आहे. ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. जिचा उद्देश्य योजनेत सहभागी लाभार्थींना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे. PM Atal Pension Yojana द्वारा लोकांना सशक्त बनवायचे आहे.
APY 2020 मध्ये गुंतवणुक केल्यानंतर लाभार्थीला वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रतिमहा पेंशन मिळेल.या योजनेअंतर्गत लाभार्थ्याचा मृत्यु झाल्यास दिली जाणारी पेंशनची रक्कम लाभार्थीच्या पत्नीस दिली जाईल.पती-पत्नी दोघाचांही मृत्यू झाल्यास पेंशनकी रक्कम ही नाॅमिनीला दिली जाईल. Pension Fund Regulatory and Development Authority ( PFRDA) ही एका नोडल एजन्सीप्रमाणे काम करते.
Atal Pension Yojana APY चे लाभ
- या योजनेचा लाभ केवळ भारतीय नागरीकच घेऊ शकतील.
- Atal Pension Yojana अंतर्गत वयाची 60 पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारद्वारे 1000 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंत मासिक पेंशन प्रदान केली जाईल.
- Atal Pension Yojana अंतर्गत पेंशनची रक्कम लाभार्थीद्वारे केलेली गुंतवणुक आणि वयाच्या आधारावर प्रदान केली जाईल.
- पीएफ खात्याप्रमाणे सरकार या योजनेतही आपले अंशदान देईल.
- जर आपण दरमहा 1000 रुपये पेंशन मिळवू इच्छिता आणि आपले वय 18 वर्ष आहे तर आपल्याला 42 वर्षापर्यंत दरमहा 210 रुपये प्रिमियम भरावा लागेल.
- 40 वर्ष वयाच्या लोकांना 297 ते 1454 रुपयांपर्यंत प्रिमियम भरावा लागेल. त्यानंतरच आपण APY 2020 चा लाभ घेऊ शकता.
अन्य वाचा : नेशनल पेंशन स्कीम (NPS)
Atal Pension Yojana साठी अनिवार्य कागदपत्रे (पात्रता)
- अर्जदार भारतीय नागरीक असावा.
- अर्जदाराचे वय 18 ते 40 असावे.
- अर्जदाराचे बँक खाते असावे आणि बँक खाते आधार कार्डाशी जोडलेले असावे.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- मोबाईल क्रमांक
- ओळखपत्
- कायमस्वरुपी पत्त्याचे प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
Atal Pension Yojana APY Scheme Contribution Chart
Entry age | Number of years of contributions | Monthly pension of Rs.1,000 and a return of corpus of Rs.1.70 lakh (Rs.) | Monthly pension of Rs.2,000 and a return of corpus of Rs.3.40 lakh (Rs.) | Monthly pension of Rs.3,000 and a return of corpus of Rs.5.10 lakh (Rs.) | Monthly pension of Rs.4,000 and a return of corpus of Rs.6.80 lakh (Rs.) | Monthly pension of Rs.5,000 and a return of corpus of Rs.8.50 lakh (Rs.) |
18 | 42 | 42 | 84 | 126 | 168 | 210 |
19 | 41 | 46 | 92 | 138 | 183 | 228 |
20 | 40 | 50 | 100 | 150 | 198 | 248 |
21 | 39 | 54 | 108 | 162 | 215 | 269 |
22 | 38 | 59 | 117 | 177 | 234 | 292 |
23 | 37 | 64 | 127 | 192 | 254 | 318 |
24 | 36 | 70 | 139 | 208 | 277 | 346 |
25 | 35 | 76 | 151 | 226 | 301 | 376 |
26 | 34 | 82 | 164 | 246 | 327 | 409 |
27 | 33 | 90 | 178 | 268 | 356 | 446 |
28 | 32 | 97 | 194 | 292 | 388 | 485 |
29 | 31 | 106 | 212 | 318 | 423 | 529 |
30 | 30 | 116 | 231 | 347 | 462 | 577 |
31 | 29 | 126 | 252 | 379 | 504 | 630 |
32 | 28 | 138 | 276 | 414 | 551 | 689 |
33 | 27 | 151 | 302 | 453 | 602 | 752 |
34 | 26 | 165 | 330 | 495 | 659 | 824 |
35 | 25 | 181 | 362 | 543 | 722 | 902 |
36 | 24 | 198 | 396 | 594 | 792 | 990 |
37 | 23 | 218 | 436 | 654 | 870 | 1,087 |
38 | 22 | 240 | 480 | 720 | 957 | 1,196 |
39 | 21 | 264 | 528 | 792 | 1,054 | 1,318 |
Penalty for default:
Under APY, the individual subscribers shall have an option to make the contribution on a monthly basis. Banks are required to collect additional amounts for
delayed payments, such amount will vary from a minimum of Rs. 1 per month to Rs 10/- per month as shown below:
- Rs. 1 per month for contribution up to Rs. 100 per month.
- Rs. 2 per month for contribution up to Rs. 101 to 500/- per month.
- Rs. 5 per month for contribution between Rs 501/- to 1000/- per month.
- Rs. 10 per month for contribution beyond Rs 1001/- per month.
The fixed amount of interest/penalty will remain as part of the pension corpus of the
subscriber.
Discontinuation of payments of contribution amount shall lead to the following:
- After 6 months account will be frozen.
- After 12 months account will be deactivated.
- After 24 months account will be closed.
Exit and pension payment
- Upon completion of 60 years, the subscribers will submit the request to the
associated bank for drawing the guaranteed monthly pension.
- Exit before 60 years of age is not permitted, however, it is permitted only in
exceptional circumstances, i.e., in the event of the death of beneficiary or terminal
disease.
Table of contribution levels, a fixed monthly pension of Rs. 5,000 per month to subscribers and his spouse and return of corpus to nominees of subscribers
and the contribution period under Atal Pension Yojana
अन्य वाचा : सुखी आणि समृद्ध राहण्याचा राजमार्ग.
अटल पेंशन योजना 2020 साठी अर्ज कसा करावा?
जी इच्छुक व्यक्ती पंतप्रधान अटल पेंशन योजनेअंतर्गत अर्ज करु इच्छिते तिने सर्वप्रथम कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत आपले बचत खाते उघडावे. त्यानंतर पंतप्रधान अटल पेंशन योजनेसाठी अर्जात विचारलेली सर्व माहिती उदा.आधार कार्ड,मोबाईल नंबर,आदी भरावी. अर्ज भरल्यानंतर तो बँक व्यवस्थापकाकडे (मॅनेजर) जमा करावा. यानंतर आपल्या सर्व कागदपत्रांचे सत्यपन होऊन अटल पेंशन योजनेसाठी आपले खाते उघडले जाईल.