पीएम शेतकरी सम्मान निधि योजना : ९ ऑगस्ट ९वा हप्ता , आपल्याला भेटला का नाही असे तपासा

भारत सरकारने देशाच्या छोट्या आणि अल्पभूधारक शेतकर्यांचा विचार करुन पंतप्रधान शेतकरी सन्मान निधि योजनेची घोषणा 1 फेब्रीवारी 2019 रोजी केली. त्यानंतर सरकारकडून शेतकर्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये रक्कम  अर्थिक मदत म्हणून प्रदान केली जात आहे. या योजनेअंर्गत केंद्र सरकारद्वारे नवव्या टप्पाचे वितरण 9 आॅगस्ट रोजी करण्यात आले.

 त्या माध्यमातून रजिस्टर्ड शेतकर्यांना लाभ मिळाला ते कशाप्रकारे आपले खाते चेक करु शकतात,आणि ज्या शेतकर्यांनी अजूनही अर्ज सादर केला नाही,ते अर्ज कशाप्रकारे सादर करु शकतात,याची माहिती आमची ही पोस्ट वाचल्यानंतर आपल्याला मिळेल.

 

पीएम शेतकरी सन्मान निधि योजना काय आहे?

मध्यस्थ आणि अल्पभूधारक  शेतकर्याचा विचार करुन केंद्र सरकारने प्रतिवर्ष 6000 रुपयांची रक्कम थेट बँक ट्रान्सफरच्या माध्यमातून 

अर्थिक सहायतेच्या रुपात देण्याचे ठरवले. त्याअंतर्गत शेतकर्यांना 6000 रुपयांची रक्कम तीन टप्प्यात दिली जात आहे.

  या योजनेच्या अंतर्गत देशातील सुमारे 12 कोटी लहान आणि अल्पभूधारक शेतकर्यांना सहभागी करुन   लाभ दिला जात आहे. या योजनेच्या अंतर्गत सरकारकडुन  75,000 कोटी रुपये खर्च केले जात आहे.  अातापर्यंत शेतकर्यांच्या खात्यात  8 टप्पे  पोहोचले आहेत. आणि  नुकतेच नरेंद्र  मोदी यांनी  9 वा टप्पाही ट्रान्सफर केला आहे.

 

पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा 9 हप्ता 

पंतप्रधान किसान सन्मान निधि योजना जेव्हापासून सुरु झाली तेव्हापासुन एका टप्यानंतर नंतर एक  अशाप्रकारे त्यांच्या बँक खात्यावर पोहोचवली जात आहे. या योजनेअंर्गत 9 आॅगस्ट रोजी नववा टप्पा पोहचवला गेला आहे.  शेतकर्यांच्या  खात्यामध्ये थेट बैंक ट्रांसफरच्या पर्यायाचा वापर करत नववा टप्याची रक्कम अर्थात  2000 रुपए पोहोचवले आहेत.

 

पंतप्रधान शेतकरी सन्मान  निधि योजनेतील बदल

योजना सुरु झाल्यानंतर आतापर्यंत  योजनेअंतर्गत खूप  बदल केले गेले आहेत,ते खालीलप्रमाणे आहेत.

 • आधार कार्ड अनिवार्य – या योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी   लाभार्थ्याकडे  आधार कार्ड असणे अनिवार्य केले गेले आहे.ज्या शेतकर्यांकडे  आधार कार्ड नाही,त्यांनी या योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी त्वरीत  आपले  आधार कार्ड तयार करुन घ्यावे.
 • जमीनीची मर्यादा समाप्त – या योजनेच्या प्रारंभी  के फक्त तेच शेतकरी अर्ज करु शकत होते, ज्यांच्याकडे 2  व्हेक्टर  अथवा 5 एकर शेतीसंबंधित जमीन उपलब्ध आहे. परंतु सध्या देशातील सर्व शेतकर्यांना या योजनेत जोडण्यासाठी जमीन मर्यादेची अट रद्द केली आहे.
 • स्टेटस पाहण्याची सुविधा –  ज्या शेतकर्यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केला अथवा करायचा आहे. ते आपल्या अर्जाची सद्यस्थिती स्वत: माहिती करुन घेऊ शकतात. त्यासाठी त्यांच्याकडे फक्त आपला  आधार कार्ड नंबर अथवा रजिस्टर्ड मोबाइल नंबर अथवा बैंक खाते असणे  अनिवार्य आहे.या सगळ्याच्या मदतीने  आपल्याला आपल्या  अर्जाची सद्यस्थिती माहीती करुन घेता येते.
 • स्वयं रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा–  वर्य  2019 मध्ये जेव्हा या योजनेचा शुभारंभ करण्यात आला तेव्हा या योजनेत नोंदणी करण्यासाठी शेतकर्यांना  लेखपाल, कायदा किंवा कृषि अधिकार्यांकडे जावे लागत असे. त्यामुळे त्यांना त्रास व्हायचा आणि वेळही वाया जात असे.परंतु आता जो शेतकरी बांधव या योजनेचा लाभार्थी बनू इच्छितो तो घरबसल्या  स्वत: अर्ज करु शकतो.
 • किसान क्रेडिट कार्ड  – या योजनेतील सर्वात मोठा बदल हा आहे की, या योजनेत ज्या लाभार्थ्यांनी आपली नोंदणी केली आहे,त्यांना  किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी कोणत्याही तिरिक्त कागदपत्रांची  आवश्यकता राहणार नाही. जर एखादा शेतकरी बंधु किसान क्रेडिट कार्ड बनवू इच्छितो,तर त्याला सर्वप्रथम  पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत नोंदणी करावी लागेल. 

जर अद्याप एखाद्या शेतकरी बंधुची नोंदणी  या योजनेसाठी झाली नसेल तर ते अजूनही अर्ज करु शकतात.

अन्य वाचा : कोव्हीड लसी प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे

पीएम शेतकरी सन्मान निधि योजनेसाठी अर्ज

देशातील जे शेतकरी अद्यापही अर्ज सादर करु शकले नाहीत,ते खालील प्रक्रियेद्वारे अर्ज सादर करु शकतात- 

 • अर्जासाठी योजनेच्या साठी तयार केलीली ऑफिशल वेबसाइटवर जावे लागेल.
 • होम पेजवरच अर्जासाठी  आपल्याला फार्मर कॉर्नरचा पर्याय दिसेल.त्यावर क्लीक केल्यानंतर आपल्याला आता  तीन पर्याय दिसतील.त्यापैकी
 • ” न्यू फार्मर रजिस्ट्रेशन”च्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर नोंदणीचा अर्ज आपल्याला दिसेल. त्या फॉर्ममध्ये विचारलेली माहिती उदाहरणार्थ आपला आधार कार्ड नंबर ,इमेज कोड आदि आपल्याला प्रविष्ट करावा लागेल. माहिती प्रविष्ट केल्यानंतर 
 • सबमिटच्या  बटनावर  क्लिक करुन आपण आपला  फॉर्म  जमा करु शकतो.
 • फॉर्म को जमा केल्यानंतर  अापण भविष्यासाठी तो फार्म सुरक्षित रहावा म्हणून त्याची  प्रिंट आउट काढून ठेवू शकतौ. 

यायोजनेसाठी आपण ऑफलाइन प्रक्रियेनेही अर्ज करु शकता, त्यासाठी आपल्याला  जवळच्या तहसीलदार ,सरपंच किंवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क करावा लागेल.

 

पीएम शेतकरी सन्मान निधि योजना स्टेटस चेक

जर एखाद्या शेतकरी बंधुच्या खात्यात टप्य्याची रक्कम आली अथवा नाही हे पहायचे असल्यास  खालील प्रक्रियेद्वारे माहिती मिळू शकते.

 • टप्याच्या रकमेची स्थिती जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम  ऑफिशल वेबसाइटच्या  होम पेज वर जावे लागेल.
 • होम पेज वर आपल्याला रिपोर्टचा एक पर्याय दिसेल. त्यावर क्लीक करताच समोर यादी दिसेल.त्या यादीत
 • आपले राज्य आणि  जिल्हा निवडुन आपल्याला टप्प्याची रक्कम मिळाली अथवा नाही ,याची माहिती मिळेल.

अन्य वाचा : अटल पेंशन योजना काय आहे.(APY)

अर्ज केल्यानंतरही टप्पा नाही मिळाला तर काय करावे?

जर एखाद्या शेतकरी बंधुला पंतप्रधान सन्मान निधि योजनेशी संबंधित टप्प्याची रक्कम की अर्ज करुनही मिळाली नाही तर याचा अर्थ नोंदणी करतांना अर्जात काही त्रुटी असू शकते.   सत्यापन करतांना ज्या अर्जात त्रुटी  आढळून आल्या ते अर्ज दुरुस्तीसाठी परत  पाठवले आहे. जर  आपल्याला अजूनही  अब टप्प्याची रक्कम मिळाली नाही तर खालील त्रुटी दुरुस्त करुन पुन्हा अर्ज सादर करु शकता.

 • अर्जामध्ये शेतकर्याचे नाव इंग्रजी अक्षरात असणे अनिवार्य आहे. जर एखाद्या शेतकर्याने हिंदी भाषेत नाव दाखल केले असेल तर ते बदलून इंग्रजीत लिहावे आणि पुन्हा अर्ज सादर करावा. 
 • जर एखाद्या शेतकरी बंधुचे नाव अर्जात वेगळे आणि बँक खात्यात वेगळे असेल तर बँकेत जाऊन आधारकार्डानुसार तेच नाव तिथेही प्रविष्ट करावे. तरच आपला अर्ज सत्यापित होईल.
 • जर आपण  अकाउंट नंबर आणि आयएफएससी कोड लिहीण्यात काही चूक केली असेल तर ती पुन्हा तपासावी. आणि योग्य  अकाउंट नंबर आणि आयएफएससी कोड दाखल करुन अर्ज पुन्हा सादर करावा.
 • अर्ज नोंदणी करना गाव अथवा या जिल्ह्याच्या नावात  काही चुकीचे लिहील्यास त्याचीही दुरुस्ती करुन अर्ज पुन्हा दाखल करावा.

वरती सांगितलेल्या त्रुटी दुरुस्त केल्यानंतर आपण आपला अर्ज पुन्हा दाखल केला तर आपल्या खात्यात पंतप्रधानांच्या द्वारे बँक ट्रान्सफरच्या माध्यमातुन त्या टप्य्याची रक्कम टाकली जाईल.

1 thought on “पीएम शेतकरी सम्मान निधि योजना : ९ ऑगस्ट ९वा हप्ता , आपल्याला भेटला का नाही असे तपासा”

Leave a Comment