प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना 2021 | Pradhan Mantri Mudra Yojana In Marathi

प्रधानमंत्री मुद्रा योजना 2021  (Pradhan Mantri Mudra Yojana In Marathi ) (Mudra Loan, Government Loan), Application Form, Apply Online, Interest Rate, SBI, मुद्रा लोन कसे भेटेल , Mudra Loan Kaise Milega (ऑनलाइन फार्म)

नरेंद्र मोदी यांच्या  दूरदर्शी सरकारने कारभार आणि रोजगाराची भावना विकसीत करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी एका अर्थिक योजनेचा शुभारंभ केला आहे. या योजनेचे नाव आहे मुद्रा योजना (Micro Units Development Refinance Agency) . या योजनेच्या माध्यमातुन सरकार अर्थिक समस्यांशी झगडत असलेल्या  असंघटीत क्षेत्रातील लघुव्यवसायांना स्वस्त व्याजदरावर पैसा उपलब्ध करुन देण्याबरोबरच नवीन व्यवसाय सुरु करण्यास इच्छुक युवकांना प्रोत्साहन देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

या विषयात  हे लक्षणीय आहे की आतापर्यंत देशाची लोकसंख्या विशेषत: निम्न गटातील समूह  हा औपचारीक बँकींग प्रणालीच्या लाभापासून वंचित राहीला आहे.तो वर्ग शेतीपासून छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी सावकारांवरच निर्भर राहिला आहे. सावकारांकडुन मिळालेल्या कर्जावर त्यांना जास्तीचे व्याज त्यांना चुकवावे लागते. त्यामुळे ते कर्जाच्या अशा चक्रव्यूहात अडकतात की त्यामुळे त्यांचे जीवन दुष्कर होते.  याचप्रकारे दूसरीकडे देशातील लघु व्यावसायिकांना अशाच समस्यांचा सामना करावा लागत आहे.  अशा आस्थापनांसाठी न कोणती नियामक संस्था आहे ना कोणती बँकींग प्रणाली,जिथे त्यांना वित्तिय सहयोग मिळेल.

 भारत सरकारच्या भारतीय सांख्यिकी मंत्रालयची संस्था असलेल्या National Sample Survey Office (NSSO) च्या 2013 साली केलेल्या  सर्व्हेक्षणात म्हटले आहे की देशात जवळपास   5 करोड़ 77 लाख लघु व्यावसायिक शाखा आहेत. ज्यांचे नियंत्रण  एकल स्वामित्वाखाली आहे. यामध्ये   उत्पादनापासून  निर्माण आणि रिटेलपर्यंतच्या  गतिविधि समाविष्ट आहेत. सोबतच या शाखांपासून  प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रुपात जवळपास 1.25 कोटी  लोकांना रोजगार मिळत आहे. त्यामुळे सरकारने अशी दुरदर्शी योजना आणणे आवश्यक होते,की ज्यामध्ये   लघु व्यावसायिक शाखांना  वित्तीय सहयोग आणि मजबूती मिळेल. सोबतच रोजगारनिर्मितीही होईल.

म्हणूनच या  लघु व्यावसायिक शाखांचे बळकटीकरण करण्यासाठी  आणि त्यांचे समुचित दोहन करण्याची महत्वाकांक्षा ठेवत आपले सध्याच्या नरेन्द्र मोदी  सरकारचे  अर्थमंत्री अरुण जेटली यांनी  वर्ष 2015-16 च्या अर्थसंकल्पीय  भाषणात में मुद्रा बैंक  स्थापन करण्याची  घोषणा केली होती. त्यानंतर  सरकारच्या आश्वासनाची अंमलबजावणी करत  पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी एप्रिल 2015 ला 20,000 कोटी रुपयांच्या कोषासह  Micro Units Development and Refinance Agency Limited अर्थात  ‘मुद्रा’ लोन योजना   राष्ट्राला समर्पित केली. या विपुल कोषासोबत  3,000 कोटी रुपयांच्या ऋण गॅरेंटी कोषालाही जोडण्यात आले.

सरकारद्वारे नवनिर्मित ही एजेंसी त्या सर्व  वित्तीय संस्थाना सहयोग करेल ज्या  उत्पादन, व्यापार और सेवा संबंधी गतिविधिमध्ये  संलग्न सूक्ष्म आणि लघु व्यावसायिक शाखांना  ऋण देण्याचा व्यवसाय करत आहे.

 

Table of Contents

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना 2021 चा का मुख्य हेतू हा आहे की, (Pradhan Mantri MUDRA Loan Yojana Aim In Marathi)

 • कर्ज स्वरुपात सूक्ष्म वित्त (Micro Finance) उपलब्ध करणार्या संस्थाना आणि र त्यांच्या वित्त प्रणालीचे  नियमन आणि त्यांच्या  सक्रिय भागीदारीला  मजबूत करुन तिला स्थिरता प्रदान करणे.
 • सूक्ष्म वित्तीय संस्था (Micro Financial Institution) सोबतच अन्य एजेंसी जी लहान व्यावसायिक, दुकानदार, स्व-सहायता समूह आदींना कर्ज उपलब्ध करुन देतात त्यांना वित्त आणि   ऋण गतिविधिमध्ये  सहयोग करणे.
 • सध्याच्या सर्व  सूक्ष्म वित्तीय संस्थांना (MFI) को नोंदणीकृत करणे आणि त्यांच्या  कामगिरीच्या आधारावर  श्रेष्ठता यादी बनवणे. या यादीतून संस्थेच्या  रेकॉर्डचे आकलन केले जाऊ शकेल आणि  कर्ज घेणार्यांना श्रेष्ठ एमएफआई निवडण्यात मदत होईल.
 • दुसरीकडे  श्रेष्ठता यादी बनवल्यामुळे  संस्थाच्या मध्ये स्पर्धा वाढेल, त्यामुळे त्यांना उत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल. आणि स्वाभाविकच याचा लाभ  इच्छुक कर्जदाराला मिळेल.
 • मुद्रा बँक कर्ज घेणार्याला व्यवसायासंबंधी 
 • योग्य दिशा व  मार्गदर्शनही उपलब्ध करुन देईल.ज्यामुळे व्यवसायासंबर्भातील संकटापासून बचाव करण्यास मदत होईल.
 • सोबतच  डिफॉल्ट परिस्थितीमध्ये पैशाच्या वसुलीसाठी कोणत्या प्रक्रियेचे पालन करावे, त्याच्या निश्चितीसाठीही मुद्रा बैंक मदत करेल.
 • छोट्या व्यावसायिक शाखांना दिल्या जाणार्या कर्जाच्या हमीसाठी  मुद्रा बैंक क्रेडिट गारंटी योजना बनवेल. 
 • मुद्रा बैंक कर्ज देणार्या संस्थेला प्रभावीतंत्रज्ञान उपलब्ध करुन देईल,ज्यामुळे कर्ज आदान-प्रदानाच्या प्रक्रियेला मदत होईल.
 •  मुद्रा बैंक या योजनेत एक उपयोगी  ढांचा तयार करेल ज्यामुळे  व्यावसायिक शाखांना छोटे कर्ज  उपलब्ध करण्यासाठी  प्रभावी प्रणाली विकसित केली जाऊ शकेल.

अन्य वाचा : पीएम शेतकरी सम्मान निधि योजना

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना 2021 (Prdhan Mantri MUDRA Bank Yojana) 

अर्थ  माइक्रो यूनिट्स डेवलपमेंट रिफाइनेंस एजेंसी (Micro Units Development Refinance Agency)  असा आहे. ज्याला  MUDRA असे म्हटले गेले आहे.  मुद्राचा अर्थ धन असाही होतो हाच या योजनेचा मुख्य बिंदु आहे. 

कुटीर उद्योगांना अर्थसहायता.

 

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना 2021 स्थापना (Pradhan Mantri MUDRA Yojana) :

एप्रिल  2015 रोजी घोषित करण्यात आली. मुद्रा बैंक ही वैधानिक अधिनियमांच्या अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे. ज्यात  कुटीर उद्योगांच्या  विकासाची जबाबदारी पंतप्रधान मुद्रा योजना बँकेची राहील.

 

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनाचे लक्ष्य 

लहान कुटीर उद्योगांना बँकेकडून   आर्थिक मदत सहजतेने मिळत नाही.ते बँकेच्या अटी पूर्ण करु शकत नाही.त्यामुळे उद्योगाला पुढे नेण्यास ते असमर्थ ठरतात. त्यामुळे  मुद्रा बैंक योजना सुरु केली जात आहे. जिचे मुख्य लक्ष्य  युवा साक्षर नवयुवकांच्या कौशल्याला सक्षम आधार देणे आहे. सोबतच   महिलांना  सशक्त बनवणे आहे.

 

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनाची पात्रता

  (Pradhan Mantri MUDRA Bank Yojana Eligibility)

मुद्रा योजनेअंतर्गत ती व्यक्ती  जिच्या नावे एखादा  कुटीर उद्योग आहे अथवा  कोणासोबत भागीदारीचे योग्य  दस्तावेज असावे किंवा छोटेसे युनिट असावे, तरच  मुद्रा बैंक योजनेअंतर्गत मदत मिळू शकते.

 

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनाच्या अंतर्गत कर्ज कसे मिळेल? 

कोणत्याही भारतीय नागरिकाला मुद्रा लोनचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला खालील प्रक्रियेचे पालन करावे लागेल.

 • सर्वात प्रथम  कर्ज प्राप्त करण्यासाठी  इच्छुक व्यक्तिला जवळच्या एखाद्या बँकेत जाऊन पंतप्रधान मुद्रा योजनेसाठी त्यांच्याकडून फाॅर्म मिळवावा लागेल.
 • त्यानंतर कर्ज आवेदन फॉर्म भरुन सोबतच मागितलेले कागदपत्रे  आणि आपण करत असलेला व्यवसाय अथवा आपल्याला जो व्यवसाय करायचा असेल  त्याची विस्तृत माहीती सादर करावी लागेल.
 • त्यानंतर बँकेद्वारे निर्धारित सर्व  औपचारिकता पूर्ण कराव्या लागतील.
 • त्या औपचारिकता पूर्ण केल्यानंतर मंजुरी मिळुन  आपल्याला कर्ज उपलब्ध होईल.

अन्य वाचा : अटल पेंशन योजना काय आहे.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना लोन प्राप्त करण्यासाठी  आवश्यक कागदपत्रे

पंतप्रधान मुद्रा योजना अंतर्गत कर्ज हवे असल्यास  आवेदकाला खालील आपल्या आवेदनासोबत खालील कागदपत्रे सादर करावी लागतील.

 • ओळखीसाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, मतदान आईडी कार्ड, पासपोर्ट यापोकी एक स्व-सत्यापित प्रतिलिपि.
 • निवास पुराव्यासाठी मतदान आयडी कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट यापैकी एक अथवा  टेलिफोन अथवा वीज बिलाची  स्व-सत्यापित प्रतिलिपि.
 • जर आवेदक अनुसूचित जाति/जनजाति या मागासवर्गातील असेल त्याच्या प्रमाणपत्राची स्व-सत्यापित प्रतिलिपि.
 • व्यावसायिक युनिटशी संबधित  परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, मालकीची ओळख आदी कागदपत्रांची प्रतिलिपी.
 • अर्जदार कोणत्याही बँकेचा अथवा वित्तीय संस्थेचा अनियमित कर्जदार नसावा.
 • जर   2 लाख किंवा त्याहून  अधिक कर्जासाठी आवेदन करायचे असल्यास मागील दोन वर्षाचे आयकर विवरण  (Income Tax Return) आणि ताळेबंद  (Balance Sheet) ची प्रतिलिपि सादर करावी लागेल. शिशु वर्गाच्या कर्जासाछी  ही अट अनिवार्य नाही.
 • जर आवेदक  मोठ्या स्तरावर आपला व्यवसाय सुरु करु इच्छितो किंवा आपल्या सध्याच्या व्यवसायाचा विस्तार करु इच्छित असल्यास त्यासंदर्भातील परियोजनेचा रिपोर्ट सादर करावा लागेल. या  रिपोर्टद्वारे व्यवसायाच्या तांत्रिक आणि आर्थिक पैलुंची पडताळणी करता येईल.
 • आवेदकाला  चालू अर्थिक वर्षातील  त्याच्या युनिटद्वारे विक्री आणि नफा-तोटा याचा अहवालही सादर करावा लागेल. जर आवेदक कंपनी किंवा भागीदारी फर्म आहे तर त्यांना  त्यासंबंधी  मेंडीड अथवा मेमोरेंडमची प्रतिलिपि सादर करावी लागेल.
 • आवेदनासोबत आपले 2 फोटो संलग्न करावे लागतील. (जर आवेदक कंपनी किंवा भागीदारी  फर्म आहे तर  त्याचे संचालक अथवा भागीदारांचे दोन दोन फोटो जोडावे लागतील.)

 

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत  लोन/कर्जाची तरतुद

मुद्रा लोन योजनेअंतर्गत  कर्ज घेणार्याला तीन वर्गात विभाजीत केले आहे. या   वर्गीकरणाचा आधार व्यवसायाचे विभिन्न टप्पे आहेत – पहिल्या टप्यात व्यवसाय सुरु करणारे, में,  दूसर्या टप्प्यात  मध्यम स्थितितील व्यवसायाला मजबुती प्रदान करण्यासाठी कर्जाच्या स्वरुपात वित्ताचा शोध आणि तिसरा टप्पा  जे व्यवसायवाढीसाठी अधिक भांडवलाची गरज आहे. या तीन वर्गाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मुद्रा बँकेने कर्ज तीन भागात वितरीत केले आहे- 

 

 • शिशु लोन :

  या अंतर्गत 50 हजार रुपयापर्यंतचे कर्ज मिळेल.

 

 • किशोर लोन :

  या अंतर्गत 50 हजारापासून 5 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळेल.

 

 • तरुण लोन

  : या अंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयापर्यंतचे कर्ज निश्चित करण्यात आले आहे. 

मुद्रा लोन योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळपास  सर्व प्रकारच्या व्यावसायिक युनिटस,   कुशल व्यावसायिक आणि  सर्व  सेवा क्षेत्रांचा समावेश केला आहे. यात छोटे दुकानदार, फळ आणि भाजी विक्रेते,  रेहडीवाले, हेयर कटिंग सैलून, ब्यूटी पार्लर, होकर, सायकल-बाईक-कार दुरुस्त करणारे, ट्रांसपोर्टर, ट्रक ऑपरेटर, मशीन ऑपरेटर, दस्तकार, शिल्पी, पेंटर, खाद्यप्रक्रिया करणारे, रेस्तरां, सहकारी संस्था, स्वयं सहायता गट, लघु और कुटीर उद्योग आदी समाविष्ट आहेत.

 

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनाद्वारे भविष्यात में सादर केले जाणारे उत्पादन आणि योजना

 • मुद्रा कार्ड
 • निवेश ऋण हमी
 • ऋण मर्यादेत वाढ
 • लाभार्थींना  आधार डाटाबेस आणि जनधन खात्याशी जोडणे
 • ऋण ब्यूरोची स्थापना
 • मिक्स मार्किट सारख्या संस्थाचा का विकास.

 

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचे लाभ

 • या योजनेमुळे   छोट्या  व्यापार्याचा आत्मविश्वास वाढेल ज्यामुळे देशाचा अर्थिक विकास होईल.
 • या योजनेमुळे सुशिक्षित नवयुवकांना रोजगार मिळेल आणि त्यांचे कौशल्य उजळून समोर येईल.
 • मोठे उद्योग केवळ सव्वा कोटी लोकांना रोजगार देतात परंतु  कुटीर उद्योग 12 कोटी लोकांना रोजगार देतात. अशा उद्योगांना प्रोत्साहन दिल्यामुळे देशाचा पैसा देशातच राहील आणि त्यामुळे अर्थिक विकास होईल.
 • नवनवीन गतिविधीचा संचार होईल. त्यामुळे छोट्या व्यापार्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि स्पर्धेची भावना निर्माण होईल,जी प्रगतीसाठी सहाय्यभूत ठरेल.
 • देशाचा विकास श्रीमंताच्या विकासाने नाही तर गरिबांच्या विकासाने होतो. म्हणूनच मुद्रा बँक योजना या दिशेने एक मोलाचा निर्णय आहे.

मुद्रा बैंक योजनेचा विचार  बांग्लादेश देशातील  प्राध्यापक युनूस यांचा आहे, जो त्यांनी  वर्ष 2006 मध्ये लागू केला होता.ज्यामुळे कुटीर उद्योगाचा विकास झाला त्यानंतर  अांतरराष्ट्रीय स्तरावर  युनूस साहेब यांची प्रशंसा झाली.

 वर्ष 2015 मध्ये मुद्रा बैंक योजना देशात   लागु करण्यात आली आहे.मोठ्या संकटानंतर देशाला स्थिर करण्यासाठी  अनेक योजना लागू करण्यात आल्या आहे,ज्यात मुख्य आहेत-

 

एस बी आई द्वारे मुद्रा लोनची माहीती (SBI Bank Gives Mudra Loans Details )

स्टेट बैंक ऑफ़ इंडिया (SBI) भारताची सर्वात मोठी बँक आहे. ही बँक आता  मुद्रा लोन देऊ लागली आहे.  नुकतेच  SBI ने पश्चिम बंगालमध्ये जवळपास  80 छोटे छोटे उद्योग चालवणार्या महिलांना  शिशु लोन दिले आहे. आपणही आपल्या जवळच्या   SBI मध्ये जाऊन या योजनेची माहीती घ्या.  SBI कडून कर्ज घेणे सर्वात कठीण मानले जाते कारण ते पूर्ण पडताळणी करुनच कर्ज देतात. त्यामुळे  SBI जाण्यापूर्वी  सोबत सर्व कागदपत्रे सोबत नेण्यास विसरु नये.

शेवटी असे म्हणता येईल की  मुद्रा बैंक योजना देशाचा युवा वर्ग, मागास वर्ग, अनुसूचित जाति, अनुसूचित जनजातिसाठी एक समान संधी आहे जिच्या माध्यमातुन ते  केवळ पात्रता सिध्द करु शकतात असे नाही तर जीवन सुधारण्यासोबत देशाच्या अर्थिक विकासातही योगदान देऊ शकतात. 

या  योजने  संबंधात  म्हटले जाते की जर ही योजना आपल्या लक्ष्य प्राप्तीत  सफल झाली तर  ती यशोगाथा बनून जगासमोर येईल. 

या योजनेअंर्गत  आतापर्यंत सुमारे  10 लाख लोकांना कर्ज मिळाले आहे.

अलीकडील रिपोर्टनुसार या  योजनेने जास्तीत जास्त 3.49 कोटी नव्या व्यापार्यांना मदत केली आहे. या  योजनेअंतर्गत प्रारंभापासून  आजपर्यंत, 12.27 कोटी क्रेडिट मंजूर केले आहेत. एका रिपोर्टनुसार अशीही माहिती आहे की  जुलै 2018 पर्यंत या  कार्यक्रमाने  अधिकतम 61.12 कोटी प्राप्तकर्त्यांना को क्रेडिट की शिफारस केली आले.

 

MUDRA Loan Yojana FAQ

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना काय आहे?

या योजनेअंतर्गत जे लोक आपला नवा व्यवसाय  करु इच्छितात त्यांना सहजपणे कर्ज उपलब्ध केले जाते.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेत मुद्राचा फुलफाॅर्म काय आहे?

माइक्रो यूनिट्स डेवलपमेंट रिफाइनेंस एजेंसी

मुद्रा लोन योजनेचे किती  प्रकार आहेत?

शिशु लोन, किशोर लोन ,तरुण लोन

मुद्रा लोन अंतर्गत शिशु लोन योजनेत किती पैसे लोनच्या  रूपात दिले जातात ?

– रुपये 50000 पर्यंत

मुद्रा लोन के अंतर्गत किशोर लोन योजनेत किती पैसे लोनच्या रुपात दिले जातात?

-50000 से ₹500000 पर्यंत

मुद्रा लोन अंतर्गत तरुण लोन योजनेत  किती पैसे  लोन स्वरुपात दिले जातात?

500000 से 1000000 रुपयांपर्यत

मुद्रा लोन योजनेसाठी कुठे अर्ज केला जातो? 

बँक

Leave a Comment