नीरज चोपड़ा यांचा जीवन परिचय, भाला फेंक एथलीट, ओलंपिक 2021 | Neeraj Chopra Biography, Javelin Throw in Marathi

नीरज चोपड़ा यांचा जीवन परिचय, बायोग्राफी, भाला फेंक एथलीट, रिकॉर्ड, टोक्यो ओलंपिक, गोल्ड मैडल विजेता, शेड्यूल, जाति, धर्म [Neeraj Chopra Biography, Javelin Throw in Marathi] (Tokyo Olympic 2021, Gold Medal, Personal Best, Best Throw, World Ranking, Height, Record, Salary, Religion, Caste)

नीरज चोपडा भारताचे  जेवलिन थ्रो अर्थात भालाफेकचे खेळाडू आहेत,ज्यांनी नुकतेच Tokyo Olympics 2021 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.  शानदार जैवलिन थ्रो करत  फाइनलमध्ये आपले स्थान निर्माण करत  स्वर्ण पदक आपल्या नावावर केले. आपले आणि भारताचे नाव इतिहासाच्या पानावर अंकीत केले. त्यांनी फाइनलमध्ये आपल्या पहिल्याच प्रयत्नात  87.58 मीटर अंतरावर भालाफेक करत विक्रम प्रस्थापित केला,जो कोणी करु शकलेला नाही. त्यांच्या  भालाफेकमधील उत्कृष्ट प्रदर्शनामुळे त्यांना सैन्यात सहभागी केले गेले आहे, त्यामुळे ते आपल्या घरासाठी उपजिविकेचे साधन बनले.चला,त्यांच्याविषयी अधिक माहीती घेऊया

नीरज चोपडा यांचा जीवन परिचय (Neeraj Chopra Biography in Marathi)

नाव नीरज चोपड़ा
जन्म 24 डिसेंबर 1997
जन्म स्थान पानीपत हरियाणा
उम्र 23 साल
माता सरोज देवी
पिता सतीश कुमार
नेटवर्थ लगभग 5 मिलियन डॉलर
शिक्षा स्नातक
कोच -प्रशिक्षक उवे होन
संपूर्ण विश्वात रैंकिंग 4
पेशा जैवलिन थ्रो
धर्म हिन्दू
जाति हिन्दू रोर मराठा

 

नीरज चोपड़ा यांचा जन्म आणि परिवार (Birth and Family)

भालाफेक एथलीट नीरज चोपडा यांचा जन्म सन 1997 मध्ये 24 डिसेंबर रोजी भारतातील  हरियाणा राज्यात  पानीपत शहरात झाला. नीरज चोपडा यांच्या वडीलांचे नाव सतीश कुमार आणि आईचे नाव सरोज देवी आहे.  नीरज चोपडा यांना दोन बहीणीपण  आहेत.  भाला फेंक एथलीट नीरज चोपडा यांचे वडील हरियाणा राज्याच्या पानीपत जिल्ह्यातील एका छोट्या गावचे शेतकरी आहेत. आणि आई गृहीणी आहेत.  नीरज चोपडा यांचे एकुण 5 भावंडे आहेत, त्यांच्यात नीरज सर्वात मोठे आहेत.

नीरज चोपडा यांचे शिक्षण  (Education)

भालाफेक खेळाडू नीरज चोपडा यांनी आपले प्रारंभिक शिक्षण राज्यात झाले. मिळालेल्या माहीतीनुसार  त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण प्राप्त केले आहे.  आपले  प्रारंभिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नीरज यांनी  बीबीए कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तेथूनच ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

नीरज चोपडा यांचे प्रशिक्षक (Coach)

नीरज चोपडा यांच्या प्रशिक्षकाचे  उवे होन आहे ,जे जर्मनीचे व्यावसायिक   जैवलिन एथलिट राहिलेले आहेत.त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतल्यानंतरच नीरज एवढे छान प्रदर्शन करत आहेत

नीरज चोपडा वय आणि वैयक्तीक माहीती (Age and Personal Detail)

भालाफेक खेळाडू नीरज चोपडा यांचे सध्याचे वय 23 वर्ष आहे.अद्याप त्यांचा विवाह झालेला नाही. ते आपले पूर्ण लक्ष आपल्या ध्येयावर केंद्रीत करत आहेत. 

नीरज चोपडा करियर भालाफेक  एथलीट (Javelin Throw Athlete)

भालाफेक खेळाडू  नीरज चोपडा यांनी वयाच्या फक्त   11व्या वर्षी भाला फेकायला सुरुवात केली.  नीरज चोपडा यांनी  प्रशिक्षण घेऊन   2016 या वर्षी असा विक्रम बनवला की जो त्यांच्यासाठी लाभदायक ठरला. नीरज चोपडा यांनी 2014 साली  स्वत:साठी एक भाला विकत घेतला होता,त्याची किंमत  ₹7000 होती. त्यानंतर  नीरज यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी  ₹1,00000 रुपयांचा भाला विकत घेतला.  2017 साली आशियाई चैंपियनशिपमध्ये  50.23 मीटर अंतरावर भालाफेक करत नीरज यांची सामना जिंकला होता. याचवर्षी त्यांनी  आयएएफ डायमंड लीग इव्हेंटमध्येही सहभाग घेतला. ज्यात ते सातव्या स्थानावर राहीले, त्यानंतर नीरज यांनी आपल्या प्रशिक्षकासह खडतर प्रशिक्षण घेतले. आणि नवनवीन  कीर्तिमान स्थापित केले.

नीरज चोपडा रिकॉर्ड (Record)

 2012 साली  लखनऊ येथे  आयोजित झालेल्या  अंडर 16 नॅशनल जूनियर चैंपियनशिपमध्ये  नीरज चोपडा यांनी  68.46 मीटर भालाफेक करत सुवर्णपदक प्राप्त केले.नॅशनल यूथ चैंपियनशिपमध्ये नीरज चोपडांनी  2013 साली  दूसरे स्थान मिळवले होते. आणि त्यानंतर  आयएएएफ वर्ल्ड यूथ चैंपियनशिपमध्येही स्थान मिळवले. नीरज चोपडा यांनी  इंटरयूनिवर्सिटी चैंपियनशिपमध्ये  81.04 मीटर थ्रो फेकून एज ग्रुपचे रिकॉर्ड आपल्या नावावर केले. ही स्पर्धा   2015 साली आयोजित केली होती.

नीरज चोपडा यांनी 2016 मध्ये जूनियर विश्व चैंपियनशिपमध्ये  86.48 मीटर भालाफेक करुन नवीन विक्रम स्थापित केला आणि सुवर्णपदकही मिळवले.2016 साली   दक्षिण आशियाई खेळात पहिल्या फेरीतच  82.23 मीटर  थ्रो फेकून गोल्ड मेडल प्राप्त केले होते.

वर्ष 2018 मध्ये  गोल्ड कोस्ट मध्ये  आयोजित झालेल्या कॉमनवेल्थ खेळात  नीरज यांनी 86.47 मीटर भालाफेक करत अजून एक गोल्ड मेडल आपल्या नावे केले.2018 मध्येच नीरज चोप्राने जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत 88.06 मीटर भाला फेकला आणि सुवर्णपदक जिंकून भारताला गौरव मिळवून दिला. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय भाला फेकणारा आहे.याशिवाय याच वर्षी आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी 1958 मध्ये हा विक्रम मिल्खा सिंगने केला होता.

नीरज चोपडा  Tokyo ओलंपिक 2020 (Tokyo Olympic Match 2020)

7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:30 वाजता अंतिम सामना झाला. या सामन्यात नीरज यांनी चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. आणि भारताच्या इतिहासाच्या पानांमध्ये त्यांचे नाव नोंदवले आहे. त्यांनी अंतिम सामन्यात 6 फेऱ्यांपैकी पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये 87.58 च्या सर्वोच्च अंतराचा विक्रम केला होता, जो पुढच्या 4 फेऱ्यांमध्ये कोणताही खेळाडू तोडू शकला नाही. आणि शेवटी नीरज यांचे स्थान पहिल्या क्रमांकावर राहिले आणि त्यांनी सुवर्णपदक जिंकले.

भालाफेक एथलिट नीरज यांनी बुधवारी टोकियो ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.  86.65 मीटरच्या प्रयत्नांसह अव्वल स्थान नीरज यांनी मिळवले आणि ऑलिम्पिक फायनलमध्ये प्रवेश करणारे ते पहिले भारतीय भालाफेकपटू ठरले. यामुळे देशाला नीरज चोपडांकडुन सुवर्णपदकाची आशा आहे.

नीरज चोपडा आॅलंपिक शेड्यूल (Olympic Schedule)

जैवलिन थ्रो मध्ये  ग्रुप ए और ग्रुप बी मधुन 83.50 मीटर क्वालीफिकेशन लेवल प्राप्त करणार्या खेळाडूंसोबत  टॉप 12 खेळाडू  फाइनलमध्ये आपली पोजीशन बनवतील. फाइनल मैच 7 अाॅगस्ट रोजी  4:30 वाजता होईल.

नीरज चोपड़ा बेस्ट थ्रो (Best Throw)

आजच्या टोकियो ऑलिम्पिकच्या भालाफेक अंतिम सामन्यात नीरजची आतापर्यंतची सर्वोत्तम थ्रो 87.58 अंतर आहे. याआधी नीरज गटात 15 व्या स्थानावर  होते. नीरज चोपडा यांनी 86.65 मीटर थ्रो टाकला आणि पहिल्याच प्रयत्नांनंतर अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. फिनलंडचा लस्सी अटेल्टालो हा अजून एक भालाफेक एथलिट  होता जो पहिल्या प्रयत्नात आपोआप पात्र झाला.

नीरज चोपड़ा वर्ल्ड रैंकिंग (World Ranking)

नीरज चोपडा सध्या जगातील रैंकिंग जैवलिन थ्रोच्या श्रेणीत  चौथ्या स्थानावर आहेत. याव्यतिरिक्त अनेक पदके आणि पुरस्कार त्यांनी मिळवलेले आहेत.

नीरज चोपडा वेतन, नेटवर्थ (Salary and Net Worth)

सध्या नीरज चोपडा जेएसडब्ल्यु स्पोर्ट संघात सहभागी  आहे. प्रसिद्ध स्पोर्ट ड्रींक  कंपनी गॅटोरेडने त्यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. नीरज चोपडांच्या निव्वळ संपत्तीबद्दल बोलायचे तर  त्यांची निव्वळ संपत्ती सुमारे 5 दशलक्ष डॉलर्स आहे. नीरज यांच्या वेतनाविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही, तरीही ते विविध पुरस्कारांमधून चांगले उत्पन्न मिळवतात.

 

नीरज चोपडा यांना मिळालेले पुरस्कार (Medal and Award)

वर्ष मैडल व पुरस्कार
2012 राष्ट्रीय जूनियर चैंपियनशिप गोल्ड मेडल
2013 राष्ट्रीय युवा चैंपियनशिप रजत पदक
2016 तीसरा विश्व जूनियर अवार्ड
2016 एशियाई जूनियर चैंपियनशिप रजत पदक
2017 एशियन एथलेटिक्स चैंपियनशिप गोल्ड मेडल
2018 एशियाई खेल चैंपियनशिप स्वर्ण गौरव
2018 अर्जुन पुरस्कार

 

नीरज चोप्रा आर्मी ऑफिसर 

क्रीडापटू बनण्यापूर्वी नीरज चोप्रा भारतीय लष्करात सुभेदार म्हणून काम करत होते. यामध्ये ते ज्यूनिअर कमिशन्डा आॅफीसर होते, त्यावेळी त्यांचे वय फक्त 19 वर्षे होते. आणि ते अशा वयात राजपूताना रायफल्स चालवत असत. नीरज चोपडा यांनी इतिहासात आपले नाव नोंदवले भारताने ऑलिम्पिकमध्ये प्रथमच भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. यासाठी भारताला एकही पदक मिळालेले नाही. 2008 मध्ये अभिनव बिंद्राने नेमबाजीत भारताचे पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले होते.त्यानंतर नीरज  आज दुसऱ्यांदा भालाफेकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारे दुसरे भारतीय बनले आहे. 13 वर्षांनंतर ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भारतीय आहे नीरज  ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत भारतासाठी ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा नीरज पहिला भारतीय खेळाडू आहे. आजपासून 121 वर्षांपूर्वी भारताने अॅथलेटिक्समध्ये पहिले पदक जिंकले. यानंतर आज नीरज चोप्राने अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहासात आपले नाव नोंदवले आहे.

नीरज चोपडा Reward

नीरज यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर केवळ नीरजलाच आनंद झाला असे नाही, तर संपूर्ण भारतात आनंदाची लाट आहे. पंतप्रधान मोदी जी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, आणि विविध राज्यमंत्री तसेच सर्व देशवासी नीरजच्या विजयाबद्दल अभिनंदन करत आहेत. यामुळे त्यांच्यासाठी विविध ठिकाणांहून विविध बक्षिसे जाहीर केली जात आहेत. जे खालीलप्रमाणे आहे – हरियाणा राज्यात राहणाऱ्या नीरजला सरकारी नोकरी, अर्ध्या किंमतीत जमीन आणि  6 कोटी रुपये रोख बक्षीस देण्याचा निर्णय हरियाणा सरकारने घेतला आहे.

देशासाठी सुवर्णपदक जिंकले म्हणून पंजाब सरकारने नीरज चोपडाला 2 कोटी रुपयांची रोख रक्कम जाहीर केली आहे. याशिवाय, पंजाब सरकारने ऑलिम्पिक पदक विजेत्यांच्या नावावर पंजाबमधील विविध शाळा आणि रस्त्यांना नावे देण्याचेही जाहीर केले आहे. गोरखपूर महानगरपालिकेकडून नीरजला एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. आणि त्याच वेळी, भारतात परतल्यावर, त्याचे भव्य स्वागतही केले जाईल.यासोबतच BCCI ने भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोपडा यांना  एक कोटी रुपयांचे रोख बक्षीस वितरित करणार असल्याचेही जाहीर केले आहे. आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीच्या मालकानेही नीरज यांना एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिगो कंपनीने नीरज यांना 1 वर्षासाठी अमर्यादित मोफत प्रवास सुविधाादेण्याची घोषणा केली आहे. अशा प्रकारे नीरज चोपडा यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले .आज भारतातील प्रत्येक नागरिकाला त्याचा अभिमान वाटत आहे.

अन्य वाचा : weightlifter Mirabai Chanu biography in marathi – मिराबाई चानू

FAQ

Q : नीरज चोपड़ा कोण आहे ?

Ans : भारतीय एथलीट भालाफेक खेळाडू

Q : नीरज चोपडा यांचे वय किती आहे ?

Ans : 23 वर्ष

Q : नीरज चोपडा यांची उंची किती आहे ?

Ans : 5 फुट 10 इंच

Q : नीरज चोपडा  यांची जात कोणती?

Ans : हिन्दू रोड मराठा

Q : नीरज चोपडा यांचे वेतन किती आहे? 

Ans : 1 से 5 मिलियन डॉलरच्या आसपास

Q : नीरज चोपड़ा का ओलिंपिक 2021 चा बेस्ट थ्रो किती होता?

Ans : 87.58 मीटर

Q : जेवलिन थ्रो साठी  ओलंपिक रिकॉर्ड कितीचा आहे?

Ans : 90.57 मीटर

Leave a Comment