How To Prepare 11th CET | 11वी CET तयारी कशी करावी

How To Prepare 11th CET | 11वी CET तयारी कशी करावी

नुकताच महाराष्ट्र सरकारने अकरावीत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 11th CET-सीईटीचे टेस्ट म्हणजेच कॉमन इंत्रन्स टेस्ट चे ऑनलाइन फॉर्म भरून घेतलेले आहेत हे फॉर्म भरल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना ही 11th CET-सीईटी टेस्ट कशी असणार आहे या टेस्टमध्ये कोणते विषय येणार आहेत ही, टेस्ट कशा स्वरूपाचे असणार आहे, कोणता अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जाणार आहेत. असे अनेक प्रश्न 11th CET साठी फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांचे आहेत. आणि शेवटी How To Prepare 11th CET , 11वी CET तयारी कशी करावी 

11th CET -सीईटी फॉर्म भरल्यानंतर बरेचसे विद्यार्थी विचारत होते की या 11th CET सीईटी परीक्षेची प्रॅक्टिस करण्यासाठी काही प्रॅक्टिस टेस्ट आहेत का. ज्यावेळेस सर्व स्तरातून अशा पद्धतीचे विचारणा होत होती आणि अशातच MKCL एमकेसीएल 11th CET अकरावी सीईटीसाठी च्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रॅक्टिस टेस्ट मोफत देण्याचा निर्णय केलेला आहे ही प्रॅक्टिस टेस्ट विद्यार्थी अगदी सहजपणे आपल्या घरी लॅपटॉप वर किंवा मोबाईल वर सोडून शकतील यामध्ये असणारे m.c.q. प्रश्नयांची ते प्रॅक्टिस करू शकतील. Practice for 11th Std. CET

 

प्रॅक्टिस टेस्ट चे स्वरूप

  • MCQ च्या स्वरूपात प्रॅक्टिस (सराव) टेस्ट
  • विषय विभागणी: (इंग्रजी, विज्ञान, गणित आणि सामाजिक विज्ञान)
  • माध्यम: मराठी, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी
  • टेस्ट उपलब्ध: केंद्रात/ घरी ; कंप्यूटरवर/ स्मार्टफोनवर
  • प्रॅक्टिस (सराव) टेस्ट अगदी मोफत ( फ्री )असेल 

प्रॅक्टिस टेस्ट कशा सोडवू शकतो

या प्रॅक्टिस टेस्ट आपण लॅपटॉप असेल तर इरा ब्राऊजर मध्ये लॉगिन करून सोडवू शकतो किंवा स्मार्टफोन असेल तर इरा लाईव्ह ॲप ERA LIVE app डाउनलोड केल्यानंतर लोगिन आयडी पासवर्ड टाकून देखील आपण या प्रॅक्टिस टेस्ट सोडवू शकतो.

 

नोंदणी कोठे व कशी करावी

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल ) मार्फत घेतल्या जाणाऱ्या मोफत प्रॅक्टिस टेस्टसाठी ची नोंदणी आपण आपल्या नजीकच्या एमएस-सीआयटी केंद्रावर करू शकता किंवा खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपण आपले नोंदणी करू शकता हा नोंदणी करण्याचा फॉर्म अगदी सोपा आणि सुटसुटीत आहे यामध्ये प्रथम आपले नाव जिल्हा निवडावा जन्मतारीख मोबाईल नंबर शक्यतो मोबाईल नंबर देत असताना व्हाट्सअप चा मोबाईल नंबर दिल्यास अतिशय सोयीचे ठरेल कारण आपल्याला लिंक मिळण्यास सोपे जाईल त्यानंतर जन्मतारीख विचारलेली असेल अशा पद्धतीचा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त चार तासाच्या आत आपल्याला आयडी पासवर्ड हा मिळतो हा id पासवर्ड घेऊन आपण लॉग इन करू शकता आणि टेस्ट सोडू शकता

नोदणी करण्याची लिंक  

ERA Live ॲप मोबाईल मध्ये कसे घ्यावे

इरा लाईव्ह ॲप मोबाईल मध्ये कसे घ्यावे किंवा इन्स्टॉल करावे यासाठी सविस्तर व्हिडिओ आम्ही अगोदरच तयार केलेल्या आहे त्याची लिंक खाली देत आहोत तो आपण व्यवस्थित पाहून त्यामध्ये सांगितलेल्या या पद्धतीने इरा लाईव्ह ॲप इन्स्टॉल करावे व लॉग इन करावे

11th CET परीक्षेच्या आपणास शुभेच्छा. वरील लेखन व व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.

Leave a Comment