डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन जीवन परिचय Dr Sarvepalli Radhakrishnan biography Marathi

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जीवन परिचय आणि  अनमोल वचन ( Dr. Sarvepalli Radhakrishnan biography and Quotes )

स्वतंत्र भारताचे  पहले उपराष्ट्रपति आणि  दूसरे राष्ट्रपति म्हणून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे नाव  भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी अंकीत आहे. ते दर्शनशास्त्राचे ज्ञाते होते.  त्यांनी  भारतीय दर्शनशास्त्रात पाश्चिमात्य विचारांचा प्रारंभ केला होता.  राधाकृष्णन एक प्रसिध्द शिक्षकही होते. म्हणूनच त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ  प्रतिवर्ष   5 सप्टेंबरला ब शिक्षकदिन साजरा केला जातो. विसाव्या शतकातील विद्वानात त्यांचे नाव अग्रेसर आहे. पाश्चिमात्य सभ्यतेपेक्षा वेगळे ,हिंदुत्वाचा प्रसार देशात व्हावा,ही त्यांची इच्छा होती.राधाकृष्णन यांनी  भारत और पश्चिम दोन्हीकडे हिंदुधर्माचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही सभ्यतेचा समन्वय व्हावा,असा त्यांचा प्रयत्न होता. देशात शिक्षकांची बुध्दीमत्ता सर्वश्रेष्ठ असावी असे त्यांचे मत होते. कारण देश घडवण्यात शिक्षकांचे मोठे योगदान असते.

 

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन जीवन परिचय (Dr Sarvepalli Radhakrishnan Short biography )

जीवन परिचय बिंदु राधाकृष्णन जीवन परिचय
पूर्ण नाव डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन
धर्म हिन्दू
जन्म 5 सितम्बर 1888
जन्म स्थान तिरुमनी गाँव, मद्रास
माता-पिता सिताम्मा, सर्वपल्ली विरास्वामी
विवाह सिवाकमु (1904)
मुले 5 मुली , 1 मुलगा

 

डॉ राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी  तमिलनाडुच्या  तिरुमनी गावात एका ब्राह्मण परिवारात झाला. त्यांच्या वडीलांचे नाव  सर्वपल्ली विरास्वामी होते,ते गरीब जरुर होते परंतु विद्वान ब्राह्मणही होते. त्यांच्या वडीलांवर त्यांच्या कुटुंबाची सर्व जबाबदारी होती. त्यामुळे बालपणी  राधाकृष्णन यांना अधिक सुख-सुविधा मिळाल्या नाहीत.

 राधाकृष्णन  यांचा विवाह  वयाच्या  16 व्या वर्षी दूरच्या नात्यातील मामेबहीण  सिवाकमु यांच्याशी झाला. त्यांच्यापासून त्यांना 5 मुली आणि 1 मुलगा झाला. त्यांच्या मुलाचे नाव सर्वपल्ली गोपाल होते. जे भारताचे महान इतिहासकार होते.

राधाकृष्णन यांच्या पत्नीचा मृत्यू  1956 साली झाला.  भारतीय क्रिकेट संघाचे महान खेळाडू व्ही व्ही एस लक्ष्मण त्यांच्याच परिवाराशी संबंधित होते.

 

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण (Dr. Sarvepalli Radhakrishnan Education) : 

डॉ राधाकृष्णन यांचे बालपण  तिरुमनी गावात गेले. तिथेच  त्यांचे शिक्षण प्रारंभ झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांच्या वडीलांनी त्यांना  ख्रिश्चन मिशनरी संस्था लुथर्न मिशन स्कूल, तिरुपति येथे दाखल केले. तिथे ते 1896 से 1900 पर्यंत होते. वर्ष  1900 मध्ये  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी वेल्लूर के कॉलेजमध्ये शिक्षण प्राप्त केले. त्यानंतर  मद्रास ख्रिश्चन कॉलेज, मद्रास येथून त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले.  ते सुरुवातीपासूनच एक मेधावी विद्यार्थी होते. त्यांनी   1906 साली दर्शनशास्त्रात M.A पूर्ण केले होते. राधाकृष्णन यांना आयुष्यभर शिक्षणक्षेत्रात शिष्यवृत्ती मिळत असे. 

 

अन्य वाचा : weightlifter Mirabai Chanu biography

 

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या करिअरची सुरुवात :

1909 मध्ये  राधाकृष्णन यांना  मद्रास प्रेसीडेंसी कॉलेजमध्ये  दर्शनशास्त्राचे  अध्यापक बनवले गेले. वर्ष 1916 मध्ये  ते मद्रास रेसिडेसी कालेजमध्ये  दर्शनशास्त्राचे सहायक प्राध्यापक बनले. 1918 म्हेसुर यूनिवर्सिटीद्वारे त्यांची  दर्शनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून निवड झाली, त्यानंतर ते  oxford university मध्ये  भारतीय दर्शन शास्त्राचे शिक्षक बनले. डाॅ. राधाकृष्णन शिक्षणालाच प्रथम महत्व देत असत.  यामुळेच ते अत्यंत ज्ञानी विद्वान होते. शिक्षणाप्रती आस्थेनेच त्यांना एक कणखर व्यक्तीमत्व   प्रदान केले.  ते नेहमीच नवीन शिकण्याच्या मानसिकतेत राहत. जिथे त्यांनी M.A. केले, तिथेच उपकुलपती म्हणून कार्य करण्याची संधी त्यांना मिळाली.पण वर्षभरानंतर त्यांनी हे पद सोडले आणि  बनारस हिंदु विद्यापीठात उपकुलपती म्हणून रुजू झाले. यादरम्यान दर्शनशास्त्रावर त्यांनी लेखनही केले.

डॉ .राधाकृष्णन हे स्वामी विवेकानंद आणि वीर सावरकर यांना आपले  आदर्श मानत असत. त्यांच्याविषयी त्यांनी  गहन अभ्यास केलेला होता. 

डॉ. राधाकृष्णन यांनी आपल्या लेख आणि  भाषणांद्वारे संपूर्ण विश्वाला भारतीय दर्शनशास्त्राचा परिचय करुन देण्याचा प्रयत्न केला.  डॉ.राधाकृष्णन हे  बहुआयामी प्रतिभेचे धनी होते सोबतच  देशाच्या त्यांचे  प्रेम होते.

डॉ राधाकृष्णन यांचा राजकारणात प्रवेश :

जेव्हा  भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी जवाहरलाल नेहरू यांनी  राधाकृष्णन यांना आग्रह केला की,  विशिष्ट राजदूत म्हणून   सोवियत संघासोबत  राजनैतिक कार्याची पूर्ती करावी.  राधाकृष्णन यांनी नेहरूजींचा प्रस्ताव  स्वीकारला आणि  1947 से 1949 तक संविधान निर्मिती सभेचे सदस्य म्हणून  कार्य केले  संसदेत सर्व लोक त्यांच्या कार्याची आणि व्यवहाराची प्रशंसा करत असत. अापल्या यशस्वी शैक्षणिक कारकीर्दीनंतर त्यांनी राजकारणात पदार्पण केले.

13 मे 1952 पासून  13 मे 1962 पर्यंत ते  देशचे  उपराष्ट्रपति राहिले. . 13 मे 1962 रोजी   भारताचे राष्ट्रपति म्हणून त्यांची निवड झाली. डाॅ.राजेंद्र प्रसाद यांच्या तुलनेत त्यांचा कार्यकाळ आव्हानात्मक होता. कारण एकीकडे भारताचे चीन आणि पाकीस्तानसोबत युध्द झाले, चीनसोबतच्या युध्दात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आणि दुसरीकडे  दोन पंतप्रधानांचा मृत्यूही त्यांच्या कार्यकाळादरम्यान झाला. त्यांच्या कामाविषयी वादविवाद कभी आणि सन्मान अधिक होता.

 

अन्य वाचा : नीरज चोपड़ा यांचा जीवन परिचय

 

डॉ.राधाकृष्णन यांना मिळालेले सन्मान आणि  अवार्ड (Dr. Sarvepalli Radhakrishnan Awards) :

 

शिक्षण आणि राजकारणात उत्कृष्ट योगदान दिल्यामुळे डाॅ.राधाकृष्णन यांना  1954 मध्ये भारताचा  सर्वोच्च पुरस्कार  “भारत रत्न” देऊन सन्मानित करण्यात आले.

  • 1962 पासून डाॅ. राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ  5 सप्टेंबर हा त्यांचा  जन्मदिवस  शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. 
  •  1962 में डॉ. राधाकृष्णन यांना  “ब्रिटिश अकॅडमी” चे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले.
  • पोप जॉन पालने त्यांना  “गोल्डन स्पर” भेट केले.
  • इंग्लंड  सरकारने त्यांना “आर्डर ऑफ़ मेंरिट” चा सन्मान प्रदान केला.

डॉ. राधाकृष्णन यांनी  भारतीय दर्शन शास्त्र आणि  धर्मावर अनेक पुस्तके लिहीली. उदाहरणार्थ-  “गौतम बुद्धा: जीवन आणि दर्शन” , “धर्म आणि समाज”, “भारत आणि विश्व” इत्यादी. ते लेखन बहुधा इंग्रजीत करत असत. 

1967 रोजी प्रजासत्ताकदिनानिमित्त डॉ. राधाकृष्णन यांनी देशला संबोधित करतांना हे  स्पष्ट केले की, ते यापुढे ते राष्ट्रपती राहणार नाहीत. राष्ट्रपती म्हणून हे त्यांचे शेवटचे भाषण होते.

 

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा मृत्यु (Dr. Sarvepalli Radhakrishnan Death) :

डाॅ.राधाकृष्ण यांचे 17 अप्रैल 1975 रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. शिक्षणक्षेत्रातील त्यांचे योगदान नेहमीच स्मरण केले जाते. त्यामुळेच 5 सप्टेंबर रोजी शिक्षकदिन साजरा करुन त्यांच्याप्रती सन्मान व्यक्त केला जातो. यादिवशी देशातील प्रसिध्द आणि उत्कृष्ट शिक्षकांना त्यांच्या योगदानासाठी पुरस्कार प्रदान केले जातात. डाॅ. राधाकृष्णन यांना  मरणोत्तर 1975 साली  अमेरिका सरकारद्वारे  टेम्पलटन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार धार्मिक क्षेत्रातील उत्थानासाठी प्रदान केला जातो.  हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले गैरख्रिस्ती व्यक्ती आहेत.

 

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे अनमोल वचन (Dr. Sarvepalli Radhakrishnan Quotes) :

 

” एक साहित्यिक प्रतिभा कहा जाता है कि हर एक की तरह दिखती है , लेकिन उस जैसा कोई नहीं दिखता .”

 

” हमें मानवता को उन नैतिक जड़ों तक वापस ले जाना चाहिए जहाँ से अनुशाशन और स्वतंत्रता दोनों का उद्गम हो .”

 

” किताब पढना हमें एकांत में विचार करने की आदत और सच्ची खुशी देता है .”

 

” केवल निर्मल मन वाला व्यक्ति ही जीवन के आध्यात्मिक अर्थ को समझ सकता है . स्वयं के साथ ईमानदारी आध्यात्मिक अखंडता की अनिवार्यता है .”

 

” पुस्तकें वो साधन हैं जिनके माध्यम से हम विभिन्न संस्कृतियों के बीच पुल का निर्माण कर सकते हैं ,”

 

” कला मानवीय आत्मा की गहरी परतों को उजागर करती है . कला तभी संभव है जब स्वर्ग धरती को चूहे सूर्य छूए “

 

” लोकतंत्र सिर्फ विशेष लोगों के नहीं बल्कि हर एक मनुष्य की आध्यात्मिक संभावनाओं में एक यकीन है “

 

” कहते हैं कि धर्म के बिना इंसान लगाम के बिना घोड़े की तरह है .”

 

डॉ. राधाकृष्णन हे आयुष्यातील  40 वर्ष शिक्षक होते. शिक्षणक्षेत्रात आणि एक आदर्श शिक्षकाच्या रुपात  डॉ. राधाकृष्णन यांचे नेहमीच स्मरण केले जाईल.

 

 

Leave a Comment