पोलीस भरती करीता अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी प्रॅक्टिस टेस्ट Online Practice Test for Police Bharti Examination
महाराष्ट्र राज्यातील पोलीस विभागाच्या विविध पोलीस दलातील पोलीस शिपाई करीता अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षेची प्रॅक्टिस करण्यासाठी काही प्रॅक्टिस टेस्ट आहेत का असा प्रश्न निश्चितच पडला असेल. त्यांच्यासाठी हा लेख महत्त्वाचा आहे.
आता काळजी करण्याचे कारण नाही कारण अशातच MKCL एमकेसीएल ने पोलीस भरतीच्या उमेदवारांसाठी प्रॅक्टिस टेस्ट मोफत देण्याचा निर्णय केलेला आहे. ही प्रॅक्टिस टेस्ट उमेदवार अगदी सहजपणे आपल्या घरी लॅपटॉप किंवा मोबाईल वरून सोडवू शकतील. यामध्ये असणारे m.c.q. प्रश्नांची प्रॅक्टिस करू शकतील. Online Practice Test for Police Bharti Examination.
Table of Contents
प्रॅक्टिस टेस्ट चे स्वरूप
- MCQ च्या स्वरूपात प्रॅक्टिस (सराव) टेस्ट
- विषय विभागणी: ( सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी, मराठी व्याकरण )
- टेस्ट उपलब्ध: MKCL केंद्रात/ घरी ; कंप्यूटरवर/ स्मार्टफोनवर
- प्रॅक्टिस (सराव) टेस्ट अगदी मोफत ( फ्री )असेल
प्रॅक्टिस टेस्ट कशा सोडवू शकतो
या प्रॅक्टिस टेस्ट आपण लॅपटॉप असेल तर इरा ब्राऊजर मध्ये लॉगिन करून सोडवू शकतो किंवा स्मार्टफोन असेल तर इरा लाईव्ह ॲप ERA LIVE app डाउनलोड केल्यानंतर लोगिन आयडी पासवर्ड टाकून देखील आपण या प्रॅक्टिस टेस्ट सोडवू शकतो.
नोंदणी कोठे व कशी करावी
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल ) मार्फत घेतल्या जाणाऱ्या मोफत प्रॅक्टिस टेस्टसाठी ची नोंदणी आपण आपल्या नजीकच्या एमएस-सीआयटी केंद्रावर करू शकता किंवा खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपण आपले नोंदणी करू शकता हा नोंदणी करण्याचा फॉर्म अगदी सोपा आणि सुटसुटीत आहे यामध्ये प्रथम आपले नाव जिल्हा निवडावा जन्मतारीख मोबाईल नंबर शक्यतो मोबाईल नंबर देत असताना व्हाट्सअप चा मोबाईल नंबर दिल्यास अतिशय सोयीचे ठरेल कारण आपल्याला लिंक मिळण्यास सोपे जाईल त्यानंतर जन्मतारीख विचारलेली असेल अशा पद्धतीचा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त चार तासाच्या आत आपल्याला आयडी पासवर्ड हा मिळतो हा id पासवर्ड घेऊन आपण लॉग इन करू शकता आणि टेस्ट सोडू शकता
नोदणी करण्याची लिंक
ERA Live ॲप मोबाईल मध्ये कसे घ्यावे
इरा लाईव्ह ॲप मोबाईल मध्ये कसे घ्यावे किंवा इन्स्टॉल करावे यासाठी सविस्तर व्हिडिओ आम्ही अगोदरच तयार केलेल्या आहे त्याची लिंक खाली देत आहोत तो आपण व्यवस्थित पाहून त्यामध्ये सांगितलेल्या या पद्धतीने इरा लाईव्ह ॲप इन्स्टॉल करावे व लॉग इन करावे.
पोलीस भरती करीता अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा. वरील लेखन व व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.