दिनात दिन शिक्षक दिन लेख shikshak din article 2021

दिनात दिन शिक्षक दिन

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जनलोका ।

जगद्गुरू संत तुकाराम महाराज

एक शिक्षक या देशाचा राष्ट्रपती बनू शकतो हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या कर्तृत्वातून अन प्रयत्नातून सिद्ध केले आहे शिक्षक समाजाचा निर्माता आहे . राष्ट्रउभारणीच्या कार्यात शिक्षकाचा सिंहाचा वाटा असतो , आमच्या शिक्षकाचे दैवत म्हणजे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यावर शब्दरूपी रले शिक्षक बांधवांना चढवायचे आहेत तुमच्या शब्दा त्यांचे जीवन घडणार आहे . म्हणूनच शब्दरूपी धनाचे वाटप आपल्याला योग्य अध्यापन पद्धती द्वारे अचूकपणे करायचे आहे . जे जे ऐकावे ते सारव नव । रोजच्या भूकंपातून उच्वस्त होतात माणुसकीचे कित्येक गावं । म्हणून आपल्याला मम्मी डॅडी च्या संस्कृतीतून सर्वप्रथम विद्यार्थ्याला माणूस बनवायचे काम करायचे आहे चांगले विद्यार्थी शोधावे लागतील , त्यांच्यातील योग्य परिपोष करावा लागेल . गरीब असो वा श्रीमंत शहरी असो या ग्रामीण परिस्थितीनुरूप अध्यापन महत्त्वाचे आहे . गरीब मुले . ग्रामीण भागातील मुले बुद्धिवान नसतात असं नाही.

ज्वारीच्या दाण्यातील पुढे फिके वाटतात मोती । खडे खारट मिठाचे अमृताला लाजवीती ।

म्हणून ग्रामीण , डोंगरी , आदिवासी , मागासलेल्या मुलांकडे दुर्लक्ष होता कामा नये जाती – धर्म स्वार्थासाठी संस्कृतीचं रूप गेलं । वरवर नुसता गाजावाजा सारं कसं लोप झालं । भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन शिक्षकालाच करायचे आहे . दूध पाणी सगळे हंस करतो वेगळे । आम्हाला हंस व्हायचे आहे खगळे नव्हे शोध कालचा जुना झाला या स्पर्धेतल्या युगातला.

चंद्रसूर्य नभीचा झाकायला मात्र अजून कुठे शोध लागला.संशोधनाच्या वाटा सर्वांसाठी खुल्या करून द्यायच्या आहेत म्हणूनच वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यात निर्माण करून अंधश्रद्धेला गाडण्याचे कार्य आपल्यालाच करायचे आहे . त्यांचे मन , मेंदू , मनगट या शाबूत ठेवून त्यालाच सिंह बनवायचे आहे कुणाच्या ताटाखालचे मांजर नव्हे .

माझ्या विद्यार्थ्याला what to think नका शिकवू तर how to think याचे मार्गदर्शन करा , तीच पंचपदी , तीच कथन पद्धती , तिचं प्रश्नोत्तर पद्धती आता मुलांना आवडत नाही यातून त्यांची सुटका करा नाट्यीकरण पद्धती , स्वयं अध्ययन पद्धती , ज्ञानरचनावादाकडे वळा , साहित्याचा वापर , चेतक बदल अनेक कौशल्याचा वापर करून शिक्षण आनंददायी करा आणि विद्यार्थ्यात जिद्द , चिकाटी , सर्जनशीलता , उपकरण निर्मिती यांचा विकास साधा म्हणजे त्या बाजार व्यवस्थेतील कळसूत्री बाहुल्या बनणार नाहीत तर स्वतंत्र विचाराचे नागरिक तयार होतील .

अन्य वाचा : डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन जीवन परिचय

चंद्रसूर्य एक होती । तेथे कैसे दिनराती । गुरु शिष्यांनी एकरूप व्हावं मास्तर म्हणजे विद्यार्थ्यांसाठी मायेचं अस्तर असणारी व्यक्ती गुरुजी म्हणजे गुणवंत , रुबाबदार , जिवंतपणाचं लक्षण असणारा माणूस आणि शिक्षक म्हणजे शिस्तप्रिय , समताधिष्ठित , कर्तव्यदक्ष व्यक्ती म्हणजे शिक्षक . तुम्ही मास्तर , गुरुजी , शिक्षक कुणी व्हा पण हा बालचंद्र तुमच्याकडे म्हणजे गुरु रुपी सूर्याकडून प्रकाशीत झाला पाहिजे , ‘ मास्तर म्हणजे शेळीचा शेपूट ना इज्जत झाकता येत ना माशा हाणता येत ‘ . नाही मागता येत भिक मग मास्तरकि सिक ह्या म्हणी समाजातून तड़ीपार झाल्या पाहिजेत . तो कसला आला विचारा तो खराखुरा तत्त्वज्ञ , कलाकार , लेखक , कवी , संशोधक , शिक्षण शास्त्रज्ञ , तोच खरा समाजसुधारक , तोच , क्रांतिकारक बनला पाहिजे . त्याच्या प्रत्येक शब्दातून उजेडाची किरणं चमकली पाहिजेत . ज्ञानदाना सारख्या महान कार्यान पुनीत झालेली वास्तू म्हणाले विद्या मंदिर त्याला भ्रष्टाचाराने कलंकित होऊ देऊ नका . विद्यार्थ्याला पूर्णत्वाकडे नेणारे आशास्थान म्हणजे शिक्षक त्याला कबरस्थान करू नका शिक्षक बंधुनो तुम्ती दीनाचे कैवारी आहात दीन होऊ नका शिक्षक दिनालाही दीन करू नका , शिक्षकान साने गुरुजी बनाव , नाणे गुरुजी नाही , ” ए मेरे वतन के लोगो हे गीत विद्याथ्यांना शिकवा .

अन्य वाचा : शिक्षक दिन वर निबंध भाषण शायरी दोहे श्लोक ऑनलाईन प्रश्नमंजुषा

‘ ए मेरे वेतन के लोगो ‘ आपण बनु नका . निशाचर , वनचर , उभयचर तसेच दिवसभर Tea चर होऊ नका ,मित्रांनो आजच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करू नका . ऑनलाइन पद्धतीचा वेळोवेळी भरपूर उपयोग करा आणि या स्पर्धेच्या युगात टीका . कर्तृत्वाने पुढे व्हा मोठ्यांच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत , कोरली आहे हृदयामध्ये , गुरु ही एक सुंदर मूर्ती । स्फूर्ती देऊन विद्यार्थ्यांना , जपूया गुरुची महान कीर्ती.

धन्यवाद !

या लेखाचे लेखक हे मागील वीस वर्षापेक्षा जास्त शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहेत.

विष्णु भगवान गायकवाड ,

उच्च श्रेणी मुख्याध्यापक , कारेगाव .

Leave a Comment